IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने का घातला ब्लॅक आर्मबँड? BCCI ने स्पष्ट केले कारण

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ दंडाला काळी पट्टी बांधून उतरला आहे.
India vs England
India vs England
Published on
Updated on

Team India wearing Black Armbands during match against England ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (29 ऑक्टोबर) सामना होत आहे. लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघ दंडाला काळी पट्टी बांधून उतरला आहे. यामागील कारण बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाने दंडाला काळी पट्टी बांधण्याचे कारण सांगितले आहे. बीसीसीआयने लिहिले की 'भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दिग्गज बिशन सिंग बेदी यांच्या स्मरणार्थ दंडाला काळी पट्टी बांधली आहे.'

India vs England
Bishan Singh Bedi: 'सरदार ऑफ स्पिन' बिशन सिंग बेदी यांची कशी होती कारकिर्द? पाहा आकडेवारी

भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे 23 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त करण्यात आला होता. आता भारतीय संघानेही दंडाला काळी पट्टी बांधून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सरदार ऑफ स्पिन

सरदार ऑफ स्पिन म्हणून ओळखल्या गेलेल्या बिशन सिंग बेदी यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 67 कसोटी सामने खेळले होते. तसेच 10 वनडे सामने खेळले.

त्यांनी कसोटीमध्ये 266 विकेट्स घेतल्या. त्यांनी कसोटीत 14 वेळा एका डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली, तर एक वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. त्यांनी वनडेत 7 विकेट्स घेतल्या. त्यांनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले.

India vs England
World Cup 2023: बटलरने जिंकला टॉस! भारत-इंग्लंड संघाच्या प्लेइंग-11 मध्ये 'या' खेळाडूंना संधी

बेदी 70 आणि 80 च्या दशकात क्रिकेटविश्व गाजवलेल्या भारताच्या फिरकी चौकटीचा भाग होते. त्यांनी इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर या फिरकीपटूंसह क्रिकेटचे मैदान गाजवले.

बेदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 370 प्रथम श्रेणी सामने खेळताना 1560 विकेट्स घेतल्या. तसेच 7 अर्धशतकांसह 3584 धावाही केल्या. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज आहेत. आजही हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com