IND vs ENG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील सहाव्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला अडचणीत आणले आहे. पाचही सामन्यांमध्ये गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाज पुन्हा एकदा चमकले.
विशेषतः मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. दरम्यान, वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांचा समाचार घेत असतानाच कुलदीप यादवने आपल्या जादूई चेंडूने सर्वांना थक्क केले.
कुलदीपच्या या चेंडूने दिवंगत शेन वॉर्नच्या जादूई चेंडूची आठवण करुन दिली. कुलदीपने आपल्या जादूई गोलंदाजीने इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला आपल्या जाळ्यात अडकवले.
कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) या मॅजिक बॉलचा व्हिडिओही आयसीसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत कुलदीपची फिरकी गोलंदाजी चर्चेत राहिली. पण हा चेंडू त्याचा स्पर्धेतील बेस्ट बॉल आणि वन ऑफ द बेस्ट विकेट ठरली.
कुलदीपने गेल्या काही दिवसांपासून चमकदार कामगिरी केली आहे. संघात परत आल्यापासून तो आपल्या जलवा दाखवून देत आहे. त्याच्या या व्हर्जनला कुलदीप 2.0 असेही म्हटले जात आहे.
कुलदीप यादवबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने भारतासाठी सर्वाधिक 13 विकेट घेतल्या आहेत, त्यानंतर कुलदीप या यादीत आहे.
आपला दुसरा सामना खेळत असलेल्या मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आतापर्यंत 8 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या सामन्यातही त्याची गोलंदाजी सुरुच आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने पाच विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्ध शमीने स्टोक्स, बेअरस्टो आणि मोई अली यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दरम्यान, भारतीय संघाने याआधी पाच सामने जिंकले होते. हा सहावा सामना आहे. आतापर्यंत प्रत्येक सामन्यात भारताने दुसऱ्यांदा फलंदाजी केली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाने केवळ 229 धावा केल्या. मात्र गोलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला सावरले आणि प्रतिस्पर्ध्यांचा समाचार घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.