Rohit Sharma & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma on Virat Kohli: 'संघाच्या आतल्या गोष्टी...', विराटच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच कॅप्टन रोहित शर्मा भडकला

Pranali Kodre

Rohit Sharma on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 27 जुलैपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माने विराट कोहलीच्या फॉर्मवरील प्रश्नावर चोख उत्तर दिले आहे.

विराटने वनडे मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 121 धावांची शतकी खेळी केली होती. हे त्याने परदेशात 5 वर्षांनंतर केलेले कसोटी शतक होते.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विराटच्या परदेशातील फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. पण त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक करत टीकाकारांना चोख उत्तर दिले होते.

पण, तरी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितला विराटच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारले होते. त्याला विचारले होते की विराट मोठ्या खेळी न करण्याबद्दल चिंता होती का?

त्यावर रोहित म्हणाला, 'या प्रश्नाचे उत्तर मी खूप वेळा दिले आहे. या सर्व बाहेरच्या गोष्टी आहेत. संघात काय होत असते ते आम्हालाच माहीत असते. आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. आम्हाला फक्त सामने आणि मालिका जिंकायचे आहेत, कोण काय म्हणत आहे किंवा नाही, याची त्याची पर्वा नाही.'

तसेच वनडे मालिका जिंकण्याला प्राधान्य आहे, हे सांगताना रोहित म्हणाला, 'सध्या वनडे मालिका जिंकणे गरजेचे आहे. मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे की संघाच्या आतील गोष्टी आम्ही आतच ठेवू इच्छितो. यापुढेही मी असेच सांगेल.'

दरम्यान, विराटचा वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा कारकिर्दीतील 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. याच सामन्यात त्याने शतकी खेळी केली. त्यामुळे तो 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT