Rohit Sharma: हिटमॅनचं विक्रमी अर्धशतक! एमएस धोनीला 'या' विक्रमाच्या यादीत टॉप-5 मधून केले बाहेर

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावत रोहितने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Rohit Sharma | Yashasvi Jaiswal
Rohit Sharma | Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
Published on
Updated on

West Indies vs India, 2nd Test, Rohit Sharma surpasses MS Dhoni: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून (20 जुलै) त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह रोहितने काही विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहितने 143 चेंडूत 80 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने कसोटीत सलामीवीर म्हणून खेळताना 2000 धावांचा टप्पा पार केला.

त्याने सलामीवीर म्हणून 40 व्या डावात 2000 कसोटी धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो कसोटीत सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय सलामीवीर ठरला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर विरेंद्र सेहवाग अव्वल क्रमांकावर आहे. सेहवागने ३९ डावात सलामीवीर म्हणून कसोटीत 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.

Rohit Sharma | Yashasvi Jaiswal
Virat Kohli: 'रनमशीन' विराटचा 500 व्या सामन्यात कोणालाही न जमलेला पराक्रम, 'या' 3 विक्रमांनाही गवसणी

रोहितने धोनीलाही टाकले मागे

दरम्यान, रोहितने या अर्धशतकी खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये एमएस धोनीला मागे टाकले आहे. रोहित आता या विक्रमाच्या यादीत धोनीला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर आला आहे. तर धोनी सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

रोहितच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 443 सामन्यातील 463 डावात 17298 धावा झाल्या आहेत. तसेच एमएस धोनीने त्याच्या आंतरराष्ट्री कारकिर्दीत 538 सामन्यांतील 526 डावात 17266 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय (20 जुलै 2023 पर्यंत)

  • 34357 धावा - सचिन तेंडुलकर

  • 25548 धावा - विराट कोहली

  • 24208 धावा - राहुल द्रविड

  • 18575 धावा - सौरव गांगुली

  • 17298 धावा - रोहित शर्मा

  • 17266 धावा - एमएस धोनी

  • 17253 धावा - विरेंद्र सेहवाग

Rohit Sharma | Yashasvi Jaiswal
IND vs WI, 2nd Test: रोहित-यशस्वीची फिफ्टी, विराट शतकाच्या जवळ; पण 43 धावांत 4 विकेट्स घेत विंडिजचंही पुनरागमन

भारताकडून तिघांचे अर्धशतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 84 षटकात 288 धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्माने सलामीला यशस्वी जयस्वालबरोबर 139 धावांची भागीदारी केली. जयस्वालनेही 57 धावांची खेळी केली.

तसेच पहिल्या दिवसाखेर विराट कोहली 87 धावांवर आणि रविंद्र जडेजा 36 धावांवर नाबाद आहेत. मात्र पहिल्या दिवशी शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाले. गिलने 10 धावा केल्या, तर रहाणने 8 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com