BCCI President Roger Binny And GCA Secretary Rohan gauns dessai  Dainik Gomantak
क्रीडा

World cup 2023: भारताने घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ उठवावा : रॉजर बिन्नी

किशोर पेटकर

BCCI President Roger Binny In AGM Meeting: यावेळच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत मायदेशी खेळत आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि येथील वातावरणाचा पूर्ण लाभ उठविल्यास यजमान संघाला नमविणे कठीण असेल, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष व १९८३ विश्वकरंडक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी सोमवारी व्यक्त केले.

बीसीसीआयची ९२वी वार्षिक आमसभा सोमवारी उत्तर गोव्यात झाली. त्यानंतर त्यांनी संवाद साधला. ६८ वर्षीय कर्नाकटचे बिन्नी यांनी विश्वकरंडक विजेतेपदासाठी रोहित शर्माच्या कर्णधारपदाखालील भारतीय संघ प्रमुख दावेदार असल्याचे नमूद केले.

कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली सर्वप्रथम विश्वकरंडक जिंकता तेव्हा बिन्नी यांनी गोलंदाजीत महत्त्वाचा वाटा उचलला होता. या मध्यमगती गोलंदाजाने त्या यशस्वी मोहिमेत इंग्लिश वातावरणात सर्वाधिक १८ गडी बाद केले होते.

भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली

बिन्नी म्हणाले, की ‘‘आम्ही १९८३ साली सर्वप्रथम विश्वकरंडक जिंकला. तेव्हापासून भारताकडे आदराने पाहिले जाऊ लागले. त्या जगज्जेतेपदानंतर प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत भारत संभाव्य विजेता गणला गेला. मागील दोन विश्वकरंडक स्पर्धा आम्ही विजेतेपदाच्या जवळ पोहचलो होतो, पण ऐन टप्प्यावर अपयशी ठरलो. यावेळेस भारतीय संघ नक्कीच अडथळा पार करेल हा विश्वास वाटतो.’’

२०१५ व २०१९ साली भारताचे विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्यापूर्वी २०११ साली घरच्या मैदानावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वकरंडक जिंकला होता.

२००३ मध्ये भारताला उपविेजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर १९८७ व १९९६ मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. बिन्नी भारतातर्फे १९७९ ते १९८७ या कालावधीत २७ कसोटी (४७ विकेट, ८३० धावा), तर १९८० ते १९८७ या कालावधीत ७२ (७७ विकेट, ६२९ धावा) सामने खेळले.

गोव्यातर्फे कारकिर्दीतील शेवटचा मोसम

रॉजर बिन्नी यांनी १९७५-७६ मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यानंतर १९९१-९२ मोसमानंतर सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून ते निवृत्त झाले. त्याला बिन्नी यांनी सोमवारी उजाळा दिला.

कारकिर्दीतील अखेरच्या मोसमात ते रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दक्षिण विभागात गोव्यातर्फे खेळले. तेव्हा विभागात कमजोर मानल्या जाणाऱ्या गोव्याला बिन्नी यांच्या नेतृत्वाखाली पाचही लढतीत मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले.

त्यांनी गोव्याकडून ५ सामन्यांत ३८.४४च्या सरासरीने ३४६ धावा केल्या. यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्यांनी तीन विकेट प्राप्त केल्या. कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर हैदराबादविरुद्धच्या त्यांनी दुसऱ्या डावात शानदार शतक (१०२) झळकावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT