Goa Express: ट्रेनमधील प्रवाशांना गुंगीचे औषध पाजून लुटणाऱ्या तिघांना अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

संशयितांकडून शीतपेय, झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Margao RPF arrested Three Accused
Margao RPF arrested Three Accused Dainik Gomantak

Margao RPF Arrested Three Accused: गोव्‍यातून सुटलेल्‍या निजामुद्दीन एक्‍सप्रेसमधील आठ युवकांना गुंगीचे औषध देवून त्‍यांना लुटण्‍याची घटना 12 सप्टेंबरला घडली होती. कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये अशाच एका प्रकरणाची नोंद झाली होती. ही दोन्ही प्रकरणे गोवा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणातील संशयित तिघा आरोपींना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून शीतपेय, झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Margao RPF arrested Three Accused
Goa Express: गोवा एक्सप्रेसमधील 8 प्रवाशांना अन्नातून विषबाधा? बेळगाव जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणांची तक्रार वर्ग होताच आरपीएफ निरीक्षक विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफ मडगाव आणि वास्को एसडब्लूआरची एक टीम तैनात करण्यात आली होती.

पथकाने तक्रारदारांनी दिलेल्या वर्णनाच्या विश्लेषणावरून विविध स्थानकांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. साध्या वेशात विविध गाड्या आणि स्थानकांवर कडेकोट नजर ठेवली होती. अखेर सोमवारी मडगाव आरपीएफच्या पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकातून या प्रकरणातील 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

सरताज (29), चंदन कुमार (23) आणि दारा कुमार (29) तीघेही मूळ. बिहार अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांची चौकशी केली असता झोपेच्या गोळ्या चॉकलेट किंवा शीतपेयामध्ये मिसळून ट्रेनमध्ये प्रवाशांना देत. प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांचे सामान लुटत असल्याचे संशयितांनी सांगितले.

संशयितांकडून शीतपेय, झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

Margao RPF arrested Three Accused
BCCI Meet in Goa: ‘बीसीसीआय’च्या महसुलात प्रचंड वाढ; 92वी वार्षिक आमसभा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com