Suryakumar Yadav| rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: टीम इंडियातून सूर्याचा पत्ता होणार कट? कॅप्टन रोहित म्हणतोय, 'आधीही सांगितलं...'

सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही वनडेत गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर त्याच्या वनडे संघातील जागेवर प्रश्न उपस्थित होत असून यावर आता रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

India vs Australia ODI Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून या दोन्ही सामन्यात धावा करण्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव अपयशी ठरला आहे. त्यामुळे वनडे संघातील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

सूर्यकुमारने आत्तापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण वनडे क्रिकेटमध्ये अद्याप त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे तो वनडे संघातील जागाही पक्की करू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यातही त्याला दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली.

मात्र, सूर्यकुमारला या संधीचा फायदा घेता आला नाही. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यात त्याचा पहिलाच चेंडू खेळताना एकाच पद्धतीने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यामुळे त्याच्यावर सध्या टीका होत आहे. त्याच्या संघातील जागेबद्दल दुसऱ्या सामन्यात 10 विकेट्सने भारताच्या झालेल्या पराभवानंतर रोहितला विचारण्यात आले.

त्यावर रोहित म्हणाला, 'आम्हाला सध्यातरी श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबद्दल माहित नाही. त्यामुळे सध्या संघात जागा उपलब्ध आहे आणि आम्हाला त्याला खेळवावे लागणार आहे. त्याने मर्यादीत षटकांसाठी क्षमता असल्याचे अनेकदा सिद्ध केले आहे.'

'मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे की क्षमता असलेल्या खेळाडूंना सातत्याने दीर्घकाळासाठी संधी दिली जाईल. नक्कीच त्याला माहित आहे की त्याला वनडेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे क्षमता असलेल्या खेळाडूंना संधी दिली जाईल, जेणेकरून त्यांना असे वाटणार नाही की एखाद्या जागेसाठी त्यांना पुरेशी संधी मिळाली नाही.'

रोहित पुढे म्हणाला, 'तो नक्की गेल्या दोन सामन्यात बाद झाला. पण तरी त्याला 8 ते 10 सामन्यांमध्ये संधी देण्याची गरज आहे, जेणेकरून तो कंम्परटेबल होईल. सध्या तरी त्याला एखादा खेळाडू उपलब्ध नाही म्हणून संधी मिळत आहे. जेव्हा तो संघात नियमित खेळाडू असेल, तेव्हा संघव्यवस्थापन त्याची कामगिरी पाहिल आणि तरीही त्याच्या धावा होत नसतील, तेव्हा त्याच्याबद्दल विचार करायला सुरुवात केली जाईल. सध्या तरी आम्ही तो मार्ग स्विकारलेला नाही.'

रोहितने दिलेल्या प्रतिक्रियेवरून तरी 22 मार्चला होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

सूर्यकुमारने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 48 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 शतकांसह 1675 धावा केल्या आहेत. तसेच त्याने वनडेमध्ये 22 सामने खेळले असून केवळ 2 अर्धशतकांसह 433 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT