Suryakumar Yadav उतरला गल्ली क्रिकेट खेळायला! आयकॉनिक सुपला शॉटनं वेधलं लक्ष, पाहा Video

भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचा गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' म्हणून ओळखला जाणाऱ्या सूर्यकुमार यादवेचे देशभरात अनेक क्रिकेट चाहते आहेत. त्यामुळे तो सातत्याने चर्चेतही असतो. कधी मैदानातील फटकाबाजीमुळे, तर कधी मैदानाबाहेरील घटनांमुळे त्याच्याबद्दल चर्चा होत राहाते. नुकताच त्याचा गल्ली क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सूर्यकुमारने नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत. हे लोक त्याला त्याला प्रसिद्ध सुपला शॉट खेळायला सांगत आहे. त्यानुसार त्याने स्कूप शॉटही मारला. त्यावर जमलेल्या लोकांनी जल्लोषही केला.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav ची टीम इंडियात रेकॉर्डब्रेक एन्ट्री! कसोटी पदार्पण ठरले ऐतिहासिक

हाच व्हिडिओ सूर्यकुमार आयपीएलमध्ये खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघानेही शेअर केला आहे. या व्हिडिओला शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले आहे की 'सुर्या दादाचा आयकॉनिक सुपला शॉट.'

सूर्यकुमारचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी सूर्यकुमारचे कौतुकही केले आहे.

सूर्यकुमार सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघात

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार भारतीय संघाचा भाग आहे. त्याने याच मालिकेतील नागपूरला झालेल्या पहिल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.

त्याला त्या कसोटीत श्रेयस अय्यरच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. पण त्याला पदार्पणाच्या कसोटी सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तो या सामन्यात 8 धावांवरच बाद झाला होता.

मात्र, श्रेयसचे पुनरागमन झाल्यानंतर त्याला पुढील दोन सामन्यांमधून प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली नाही. आता अहमदाबादला होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी त्याला संधी मिळणार का हे पाहावे लागणार आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: सेम टू सेम! हार्दिकच्या बॉलिंगवर सूर्याने पकडले एकसारखेच दोन कॅच, Video व्हायरल

दरम्यान, सूर्यकुमार या कसोटी मालिकेनंतर 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसू शकतो. त्याचा या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे.

सूर्यकुमारने आत्तापर्यंत एका कसोटीशिवाय 20 वनडे सामने आणि 48 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 433 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3 शतकांसह 1675 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com