Suryakumar Yadav: सूर्याला नक्की झालंय काय? सलग दोन गोल्डन डकसह नकोसा विक्रम नावावर

India vs Australia: सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग दोन वेळा गोल्डन डकवर आऊट झाला आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी विशाखापट्टणमला झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरला आहे.

दुसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादव पाचव्या षटकात रोहित शर्मा बाद झाल्यावर फलंदाजीला आला होता. पण पहिलाच चेंडू खेळत असताना मिचेल स्टार्कने त्याला पायचीत पकडले. त्यामुळे त्याला शुन्यावरच बाद होऊन माघारी परतावे लागले.

Suryakumar Yadav
IND vs AUS 2nd ODI: मिशेल स्टार्क टीम इंडियाला नडला! 5 विकेट्स घेत केला 'हा' रेकॉर्ड

यापूर्वी पहिल्या वनडेत देखील अगदी सारख्याच प्रकारे सूर्यकुमार बाद झाला होता. पहिल्या वनडेमध्ये देखील तो पाचव्या षटकातच विराट बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला होता. पण पहिलाच चेंडू खेळताना त्याला स्टार्कने पायचीत केले होते.

त्यामुळे त्याला सलग दोन सामन्यात गोल्डन डकवर बाद व्हावे लागले आहे. सूर्यकुमार ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत दोन वेळ गोल्डन डकवर बाद होणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

यापूर्वी राहुल द्रविड, सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी असा नकोसा विक्रम केला आहे. द्रविड आणि गांगुली यांनी 2007 साली झालेल्या वनडे मालिकेत, तर हरभजनने 2009 साली झालेल्या वनडे मालिकेत आणि युवराजने 2013 साली झालेल्या वनडे मालिकेत हा नकोसा विक्रम केला आहे.

साल 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला सूर्यकुमार आत्तापर्यंत 5 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. वनडेमध्ये दोन वेळा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तीन वेळा शुन्यावर बाद झाला आहे.

Suryakumar Yadav
IND vs AUS: गोलंदाजांनी रोखलं, सलामीवीरांनी ठोकलं! ऑस्ट्रेलिया भारतात 'असा' पराक्रम करणारा पहिलाच संघ

ऑस्ट्रेलियाचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाला 26 षटाकत 117 धावांवर रोखले होते. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलने नाबाद 29 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच सीन ऍबॉटने 3 विकेट्स घेतल्या आणि नॅथन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 118 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने विकेट न गमावता 11 षटकातच 121 धावा करत विजय निश्चित केला. मार्शने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच हेडने नाबाद 51 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Five Centuries In A Single ODI Match
IND vs WI ODI Live Streaming
IND vs WI Rohit Sharma Virat Kohli Records
Suryakumar Yadav comeback to Team India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com