क्रीडा

ZIM vs IND ODI: भारताचे झिम्बाब्वे विरोधातील मालिकेवर वर्चेस्व

गोमन्तक डिजिटल टीम

भारत आणि झिब्बावेत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भाजरताने आज झालेला दुसऱ्या सामन्यात देखील भारतानं 5 विकेट्सनं विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं 2-0 अशी आघाडी घेत मालिकेवर वर्चेस्व मिळवले आहे. झिम्बाब्वे संघाने 38.1 षटकांत 162 धावांचे लक्ष्य 5 विकेट्सच्या बदल्यात 25.4 षटकात 167 धावा करत सामना जिंकला.

नाणेफक जिंकल्यानंतर भारतानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिब्बाब्वेच्या फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर सपशेल फेल ठरले. झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 161 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सनं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर, रायन बर्लेनं नाबाद 39 धावांचं योगदान दिलं. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक 3, तर, मोहम्मद सिराज, दीपक हुडा, फेमस कृष्णा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

झिम्बाब्वेनं दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल लगेच बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. धवन 33 धावा करून बाद झाला. त्यानंतर इशान किशनही 6 धावा करून बाद झाला. गिल 33 धावा केल्यानंतर बाद झाला. दरम्यान, संजू सॅमसननं उत्तम खेळी करत भारताला सामना जिंकून दिला.

भारत आणि झिब्बावेतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका भारताने खिशात घातली असून, 22 ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणारा सामना फक्त औपचारिक असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's News Wrap: शशी थरूर, पवन खेरा गोव्यात, शहांची शुक्रवारी सभा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT