Australia Team | Pat Cummins Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: कांगारुंना धक्का! कमिन्स ODI सिरीजलाही मुकणार; 'हा' खेळाडू करणार 'कॅप्टन्सी'

Pat Cummins: भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेला देखील ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स मुकणार आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी संघातील अनुभवी खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Pranali Kodre

Pat Cummins Ruled out from ODI Series against India: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 17 मार्चपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. पण, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेला मुकणार आहे.

कमिन्स गेल्याच महिन्यात भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी मायदेशी परतला होता. पण त्याच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. त्यामुळे कमिन्सने या काळात कुटुंबाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कमिन्सव्यतिरिक्त जोश हेजलवूडही या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे आता भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

स्मिथने नुकतेच कमिन्सच्या अनुपस्थितीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळले होते. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर चौथा सामना अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारल्याने भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली.

प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन होणार आहे. त्याला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. तसेच या मालिकेतून ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, एश्टन एगार यांचेही संघात पुनरागमन होणार आहे.

तसेच या मालिकेतून यापूर्वीच झाय रिचर्डसन देखील दुखापतीमुळे बाहेर झाला आहे, त्यामुळे नॅथन एलिसला त्याच्याऐवजी संघात संधी देण्यात आली आहे.

अशी होईल वनडे मालिका

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिका 17 ते 22 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हे तिन्ही सामने अनुक्रमे 17 मार्चला मुंबईत, 19 मार्चला विशाखापट्टनम आणि 22 मार्चला चेन्नई येथे होणार आहेत.

ऑस्ट्रेलियन संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन ऍबॉट, एश्टन एगार, ऍलेक्स कॅरे, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT