IND vs AUS: 'मी जॉब सोडून देऊ?', पुजाराने दिलं अश्विनला टेंशन; पाहा ट्वीटरवरील दोघांचा मजेशीर संवाद

Pujara - Ashwin: सोमवारी अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पुजारा आणि अश्विन यांच्यात ट्वीटरवर मजेशीर संवाद घडला होता.
Cheteshwar Pujara | R Ashwin
Cheteshwar Pujara | R AshwinDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारतीय क्रिकट संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. अहमदाबाद येथे पार पडलेला या मालिकेतील चौथा सामना सोमवारी (13 मार्च) अनिर्णित राहिला.

या सामन्याच्या अखेरच्या दिवशी गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अखेरच्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंनी परस्पर संमतीने पंचांना सांगून सामना काही वेळ आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्याच्या अखेरीत भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनीही गोलंदाजी केल्याचे दिसले.

Cheteshwar Pujara | R Ashwin
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला नडतोय पुजारा! 'हा' विक्रम करत सचिन-द्रविडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

याचबद्दल भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने मजेशीर ट्वीटही केले होते. चौथा सामना झाल्यानंतर अश्विनने पुजाराचा या सामन्यात गोलंदाजी करतानाचा फोटो पोस्ट करत ट्विट केले की, 'मी काय करू? जॉब सोडून देऊ?'

त्यावर पुजाराने काहीवेळातच उत्तरही दिले. त्याने अश्विनचे ट्विट रिट्वीट करत लिहिले की 'नको, हे फक्त नागपूर कसोटीत तू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेल्याबद्दल आभार मानण्यासाठी होते.'

नागपूरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना झाला होता. या सामन्यात अश्विन पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर नाईटवॉचमन म्हणून गेला होता. त्यावेळी त्याने 62 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.

दरम्यान, पुजाराच्या ट्वीटला अश्विनने प्रत्युत्तरही दिले. त्याने पुजाराच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना लिहिले की 'तुझा हेतू कौतुकास्प आहे, पण ही परतफेड कशी आहे, याबद्दल मला आश्चर्य वाटतेय.'

पुजारा आणि अश्विन यांच्यातील या मजेशीर संवादावर चाहत्यांनाही विविध प्रतिक्रिया दिल्या असून हा संवाद चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

दरम्यान, चौथ्या सामन्यानंतर देखील अश्विनने पुजाराच्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले होते. ब्रॉडकास्टरशी बोलताना अश्विन म्हणाला होता, 'मी रोहितला सांगत होतो की त्याला दुसऱ्याच सत्रात गोलंदाजी दे. मी तर हे पण म्हणत होतो की पुजाराने ६-७ षटकांचा स्पेल टाकावा. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विकेटही मिळवली आहे. त्यातही आज पुजाराच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणजे त्याने फ्लिपर बॉल टाकला असल्याचे स्टीव्ह स्मिथने ओळखले.'

'मी शॉर्ट मिड-विकेटला थांबलो होतो आणि मी हेल्मेट घालावे की नाही, असा विचार करत होतो. कारण अखेरच्या वेळी त्याने जेव्हा सेंट किट्समध्ये गोलंदाजी केली होती, तेव्हा राहकिम कॉर्नवॉलने जोरदार शॉट मारला होता, त्यावेळी तिथे कोणता खेळाडू क्षेत्ररक्षण करत होता, मला आठवत नाही, पण ते खूप मजेदार होते. मला वाटते आज त्याने चांगली गोलंदाजी केली.'

Cheteshwar Pujara | R Ashwin
R Ashwin @450: अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! कॅरीची विकेट घेत रचला इतिहास

अश्विन ठरला मालिकावीर

अश्विन या मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला. त्याने 4 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने दोन वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्यामुळे त्याला रविंद्र जडेजासह या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com