India A Women Dainik Gomantak
क्रीडा

Emerging Women's Asia Cup 2023: श्रेयंकाची भन्नाट बॉलिंग! 2 धावात घेतल्या 5 विकेट्स, भारताने 32 चेंडूतच जिंकली मॅच

Pranali Kodre

Womens Emerging Teams Asia Cup 2023, India vs Hong Kong : हाँग काँगमध्ये सध्या महिलांची एमर्जिंक एशियन कप 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतीय महिलांचा अ संघ खेळत आहे. भारताच्या या संघाने मंगळवारी (13 जून) यजमान हाँग काँगविरुद्ध 9 विकेट्सने मोठा विजय साकारला.

भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार श्रेयंका पाटील राहिली. श्रेयंकाने 3 षटकेच गोलंदाजी करताना केवळ 2 धावा दिल्या आणि 5 विकेट्स घेतल्या. तिने तिच्या 3 षटकांपैकी एक षटक निर्धाव (मेडन) टाकली होती. त्यामुळे या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही तिलाच निवडण्यात आले.

या सामन्यात हाँग काँगने भारतासमोर विजयासाठी 35 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 1 विकेट गमावत 5.2 षटकात म्हणजेच केवळ 32 चेंडूत 38 धावा करत सहज पूर्ण केला.

भारताने जिंकला सामना

या सामन्यात भारताची कर्णधार श्वेता सेहरावतने नाणेफेक जिंकून हाँग काँगच्या महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या निर्णयाचा भारतीय गोलंदाजांनी चांगला फायदा घेत हाँग काँगच्या एकाही खेळाडूला फार काळ टिकू दिले नाही.

हाँग काँगकडून केवळ सलामीला फलंदाजीला आलेली मारिको हिलच दोन आकडी धावसंख्या पार करू शकली. तिने 14 धावांची खेळी केली. तिच्यानंतर मारिना लँपलोफने सर्वाधिक 5 धावा केल्या. म्हणजेच हाँग काँगचे अन्य 8 फलंदाज 5 धावाही करू शकल्या नाहीत.

भारताकडून श्रेयंकाशिवाय पार्शवी चोप्रा, मन्नत कश्यप आणि तितास साधू यांनीही विकेट्स घेतल्या. तितासने 2 षटकांपैकी एक षटक निर्धाव टाकताना 3 धावा देत एक विकेट घेतली. तसेच पार्श्ववीने 3 षटकांत 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच मन्नतने 2 षटकांत 2 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे हाँग काँगचा संघ 14 षटकातच 34 धावांवर सर्वबाद झाला.

त्यानंतर 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या षटकात कर्णधार श्वेताची (2) विकेट गमवली. पण नंतर उमा छेत्री आणि गोंगाडी त्रिशा यांनी सहाव्या षटकातच भारताला विजय मिळवून दिला. उमाने 15 चेंडूत 16 धावा केल्या, तसेच त्रिशाने 13 चेंडूत 19 धावा केल्या. हाँग काँगकडून श्वेताची एकमेव विकेट बेट्टी चॅनने घेतली.

भारताचा पुढील सामना

दरम्यान भारताचा पुढचा सामना 15 जूनला ग्रुप एमधील नेपाळ महिला संघाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 17 जूनला पाकिस्तान अ संघाविरुद्ध भारताचा तिसरा सामना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT