श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मागे लागलेले कोरोनाचे (Covid19) शुल्ककाष्ट काही सुटताना दिसत नाही. ऑलराउंडर कुणाल पांड्या (Kunal Pandya) याच्या नंतर आता स्पिनर यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gautam) यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. हे दोघेही सध्या विलगीकरणात आहेत. हे दोघे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या कुणाल पांड्याच्या संपर्कात आले होते.
यजुवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम यांच्या शिवाय पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, दीपक चहर, आणि ईशांत किशन हे देखील संपर्कात आले होते.
IND vs SL टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले, वनडे मालिका टीम इंडियाने आपल्या नावावर केली. टी-20 मध्ये देखील भारतीय संघ 1-0 असा पुढे होता. परंतु दुसऱ्या सामन्याच्यावेळी भारतीय संघाचा खेळाडू कुणाल पांड्या पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली. याचा फटका भारतीय संघाला बसला असून भारतीय संघाने टी-20 मालिका गमाविली आहे. आता कुणालच्या संपर्कात आलेले कृष्णप्पा गौतम आणि यजुवेंद्र चहल यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.