रहाणेने (Ajinkya Rahane) गेल्या अनेक सामन्यांमध्ये ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ते पाहता हा खेळाडू संघात कायम राहील, असे वाटत नव्हते पण त्याला अखेरची संधी देण्यात आली आहे. Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: अफ्रिका दौरा अजिंक्य राहणेसाठी शेवटची संधी

राहुल द्रविडमुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) टीम इंडियात कायम ठेवण्यात आले आहे. रहाणेला आणखी एक संधी द्यावी, अशी राहुल द्रविडची इच्छा आहे.

दैनिक गोमन्तक

खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी टीम इंडियात (Team India) निवड करण्यात आली आहे. बुधवारी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला, त्यात अजिंक्य रहाणेच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. रहाणेने गेल्या अनेक सामन्यांमध्ये ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ते पाहता हा खेळाडू संघात कायम राहील, असे वाटत नव्हते पण त्याला अखेरची संधी देण्यात आली आहे. मात्र, अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले असून रोहित शर्माकडे (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात आली आहे.

अजिंक्य रहाणेची गेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये कामगिरी अत्यंत खराब राहिली असून या काळात त्याची फलंदाजीची सरासरी 19 पेक्षा कमी आहे. इतकेच नाही तर त्याची कसोटी कारकिर्दीतील सरासरीही 40 च्या खाली गेली आहे. पण तरीही टीम इंडिया व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत रहाणेला शेवटची संधी दिली आहे.

कोणी दिली राहणेला संधी?

पीटीआयच्या वृत्तानुसार, राहुल द्रविडमुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियात कायम ठेवण्यात आले आहे. रहाणेला आणखी एक संधी द्यावी, अशी राहुल द्रविडची इच्छा आहे. दक्षिण आफ्रिकेतही रहाणे फ्लॉप ठरला, तर ही त्याची शेवटची मालिका असेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "राहाणेला कायम ठेवण्याचे कारण हे देखील आहे की विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा देखील बर्याच काळापासून धावा करत नाहीत. तिघेही सध्या बॅडपॅचमध्ये असताना एकाच खेळाडूला वगळणे योग्य होणार नाही. गिल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला असून त्याला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून तेथे संधी दिली जाणार होती. मात्र गिलची दुखापत ही रहाणेसाठी शेवटची संधी ठरली आहे.

रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान मिळाले असले तरी त्याच्या पहिल्याच सामन्यात खेळणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो. अय्यरने न्यूझीलंड विरुध्द पहिल्याच कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेत पुजारावरही नजर असेल. त्याच्या बॅटमधूनही सध्या धावा निघत नाहीत, त्यामुळे त्याच्या जागी मयंक अग्रवाल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.

दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया - विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT