IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुध्द टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा बनला कर्णधार

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड करण्यात आली आहे. मोठी बातमी म्हणजे अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपद राहणार आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, हनुमा विहारी यांचे संघात पुनरागमन झाले आहे. अक्षर पटेल आणि शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. जडेजाही दुखापतीमुळे दौऱ्यावर जाणार नाही. जयंत यादव, इशांत शर्मा या दोघांची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारत या दौऱ्याला एक आठवडा उशिराने जात आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे मालिकेला उशीर झाला. तसेच टी-20 मालिकाही पुढे ढकलण्यात आली.

Team India
'संघात स्थान मिळवायचे असेल तर, खेळाडूंना घरेलू क्रिकेट खेळावेच लागेल': राहुल द्रविड

भारतीय संघ आधी 9 डिसेंबरला रवाना होणार होता पण सहलीचा कार्यक्रम बदलला. आता पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सुरू होईल, जी आधी 17 डिसेंबरपासून सुरु होणार होती. दुसरी कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान वँडरर्स येथे आणि तिसरी कसोटी 11 ते 15 फेब्रुवारी दरम्यान केपटाऊन येथे खेळवली जाईल. तीन एकदिवसीय सामने बोलँड पार्क, पारल (19 आणि 21 जानेवारी) आणि केपटाऊन (23 जानेवारी) येथे होणार आहेत. कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. त्याच वेळी, एकदिवसीय मालिका आयसीसी विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळली जाईल, जी 2023 विश्वचषक पात्रता स्पर्धा आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे-

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत शर्मा, शरिर कुमार, बी. , मोहम्मद सिराज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com