IND vs SA: दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, चार खेळाडूंना दुखापत

IND vs SA दौऱ्यासाठी आजच टीम इंडियाची घोषणा होणार होती, मात्र अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्याला विलंब होत आहे
IND vs SA: Big blow to Team India before the tour four players injured
IND vs SA: Big blow to Team India before the tour four players injuredDainik Gomantak

भारताला दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दौऱ्यासाठी सज्ज आहे मात्र त्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. या दौऱ्यासाठी आजच टीम इंडियाची घोषणा होणार होती, मात्र अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्याला विलंब होत आहे.टीम इंडियाचे किमान चार खेळाडू जखमी झाले असून त्यांना बरे होण्यास वेळ लागणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे हे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) जाऊ शकणार नाहीत. इशांत शर्मा (Ishant Sharma), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel)आणि शुभमन गिल (Shubhman Gill) अशी या जखमी खेळाडूंची नावे आहेत. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार , या चौघांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी काही महिने लागू शकतात. रवींद्र जडेजा आणि इशांत दुखापतीमुळे मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला खेळू शकले नाहीत.(IND vs SA: Big blow to Team India before the tour four players injured)

टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या इशांतपेक्षा रवींद्र जडेजाची दुखापत ही वाईट बातमी आहे. टीम इंडियाकडे इशांतचा पर्याय म्हणून खेळाडू आहेत पण जडेजाचा पर्याय नाही. कारण डावखुरा फिरकीपटू आणि फलंदाज अक्षर पटेलही तंदुरुस्त नाही. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरचा त्रास होत आहे.त्यामुळे या दोघांना पर्याय म्हणून कोणीच नसल्याची समस्या आता निवडकर्त्यांसमोर आहे. आर अश्विन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असेल. तेथे दोन फिरकीपटूंची जागा निर्माण झाली नसली तरी आतापर्यंत जडेजा आणि अक्षर यांनी फलंदाजीसोबतच चांगले योगदान दिले आहे.

तर दुसरकिडे दक्षिण आफ्रिकेने आपला संघ घोषित केला आहे. संघाने 21 खेळाडूंची निवड केली आहे. जे घरच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाशी सामना करताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 21 सदस्यीय संघात दोन नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी डिओन ऑलिव्हरचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. संघाचे नेतृत्व डीन एल्गर करणार आहे, तर टेम्बा बौमा संघाचा उपकर्णधार असेल.

IND vs SA: Big blow to Team India before the tour four players injured
IND vs SA: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जावे लागणार आहे. हा दौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका खेळली जाणारप आहे. आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळविण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी सेंच्युरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे होणार्‍या कसोटी मालिकेतील तीन सामने संपले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com