Virat Kohli & Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: रोहित की विराट, पाकिस्तानविरुद्ध कोणाचा रेकॉर्ड आहे भारी!

IND vs PAK: आशिया कपला उद्यापासून (बुधवार) सुरुवात होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे.

Manish Jadhav

IND vs PAK: आशिया कपला उद्यापासून (बुधवार) सुरुवात होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली आहे.

टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सर्वात जास्त आशा त्यांच्या दोन सर्वात अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून आहेत. या दोन्ही खेळाडूंनी अनेक वेळा टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला आहे.

पाकिस्तानविरुद्धही असे क्वचितच घडले असेल, जेव्हा दोन्ही फलंदाजांनी धावा केल्या नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित आणि विराटच्या फलंदाजीच्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत. या 15 सामन्यांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांचा समावेश आहे.

रोहित-विराट पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळू शकले नाहीत

दरम्यान, आधी दोघांच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलूया, रोहित आणि विराट हे दोघेही पाकिस्तानविरुद्ध कधीच कसोटी खेळू शकले नाहीत.

रोहितने पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत, तर विराटने कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 13 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. रोहितने पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.42 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत. तर 11 T20 मध्ये 118.75 च्या स्ट्राइक रेटने 114 धावा केल्या आहेत.

त्याचवेळी, विराटने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.72 च्या सरासरीने 536 धावा केल्या आहेत तर 10 टी-20 मध्ये 81.33 च्या सरासरीने आणि 123.85 च्या स्ट्राइक रेटने 488 धावा केल्या आहेत.

गेल्या 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विक्रम

गेल्या 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (ODI + T20I) या दोघांचाही पाकिस्तानविरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. मात्र, रोहितपेक्षा कोहलीचे पारडे जड आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 15 डावांमध्ये 561 धावा केल्या आहेत, तर कोहली आपल्या 15 सामन्यांमधील दोन सामने खेळला नाही.

त्याने 13 डावात 671 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितने दोन शतके आणि तीन अर्धशतके, तर कोहलीने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यानंतर दोघांच्या शेवटच्या 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हे आकडे आहेत.

दुसरीकडे, रोहित पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपयशी ठरला असून त्याने 4, 28, 12, 0 धावांची खेळी खेळली आहे. तर कोहलीने या चार सामन्यांमध्ये 82*, 60, 35 आणि 57 धावा केल्या.

अशा स्थितीत रोहितकडून पाकिस्तानविरुद्ध धावा करणे अपेक्षित आहे. मात्र, आशिया चषक एकदिवसीय सामन्यात रोहितचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. यादरम्यान त्याने सात सामन्यांच्या सात डावांमध्ये 73.40 च्या सरासरीने 367 धावा केल्या आहेत.

यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक एकदिवसीय सामन्यात तीन सामन्यांच्या तीन डावात 68.66 च्या सरासरीने 206 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.

यंदा आशिया चषक एकदिवसीय आणि हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवला जाईल. स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर सुपर-फोर आणि अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जातील.

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत (India), यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.

यावेळी, आशिया कप 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रुप देण्याची ही सुवर्णसंधी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT