Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकविरुध्द टीम इंडियाची फायनल Playing 11, या खेळाडूंना मिळाला डच्चू

T20 विश्वचषक 2022 मध्ये मेलबर्न ग्राउंडवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु झाला आहे

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषक 2022 मध्ये मेलबर्न ग्राउंडवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु झाला आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या शानदार सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मजबूत संघ मैदानात उतरवला आहे.

ही टीम इंडियाची टॉप ऑर्डर आहे

केएल राहुल रोहित शर्मासोबत पाकिस्तानविरुद्ध डावाची सुरुवात करेल. सराव सामन्यात केएल राहुलने शानदार फलंदाजी केली होती. त्याचबरोबर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. आशिया चषकापासून विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

मधल्या फळीत स्थान मिळाले

भारताच्या (India) प्लेइंग इलेव्हनची मधली फळी यावेळी नेहमीपेक्षा मजबूत दिसत आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी आहे. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलसारखा अष्टपैलू खेळाडू खेळताना दिसेल.

रोहितने या गोलंदाजांना संधी दिली

2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीमुळे गोलंदाजांवर अधिक दडपण असणार आहे. रोहितने या सामन्यात फिरकीपटू आर अश्विनसह भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: क्रिकेट फॅन्ससाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी 'मुंबईच्या राजा'ची शिवाजी पार्कवर 'पॉवर हिटिंग' Watch Video

Sawantwadi Crime: 'ती' आत्महत्या कौटुंबिक कारणामुळेच? मोती तलावात उडी घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह 17 तासांनी सापडला

Nobel Peace Prize 2025: डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले; व्हेनेझुएलाच्या मारिया मचादो यांना मिळाला नोबेल शांतता पुरस्कार

Yashasvi Jaiswal Century: शतक पूर्ण... सेलिब्रेशन व्हायरल! यशस्वी जयस्वालने 'ती' फ्लायिंग किस कोणासाठी दिली? Watch Video

IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

SCROLL FOR NEXT