Rohit Sharma Record Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG 5th Test: रोहितचा 'यशस्वी' किर्तीमान, विराट-धोनीच्या खास क्बलमध्ये सामील

Rohit Sharma Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे.

Manish Jadhav

IND vs ENG 5th Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यातही भारतीय संघाने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 218 धावांवर ऑलआऊट झाला.

पहिल्याच दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी आला. जिथे भारतीय संघाचा कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज रोहित शर्माने आपल्या जबरदस्त फलंदाजीने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला.

यादरम्यान, रोहितने कर्णधार म्हणून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने अशी कामगिरी केली जी आजपर्यंत फक्त पाच फलंदाज करु शकले, असे करणारा तो जगातील सहावा खेळाडू ठरला.

रोहित शर्माच्या नावावर मोठा रेकॉर्ड

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या काळात त्याने शतकही झळकावले. या मालिकेतील पाचव्या सामन्यादरम्यान रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण केल्या. यासह तो एका खास क्लबमध्ये सामील झाला.

आता या क्लबमध्ये सहा खेळाडू आहेत. हा क्लब अशा खेळाडूंचा आहे, ज्यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये 1000 धावा केल्या आहेत. रोहित शर्माशिवाय विराट कोहली, एमएस धोनी, केन विल्यमसन, फाफ डू प्लेसिस आणि बाबर आझम यांनी ही कामगिरी केली आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड

रोहित शर्माने भारतीय कर्णधार म्हणून 114 सामने खेळले आहेत. जिथे त्याने 84 विजय आणि 26 पराभवांची नोंद केली आहे. दोन अनिर्णित आणि एका निकाल न लागलेल्या सामन्यातही त्याने संघाचे नेतृत्व केले.

कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्माने कर्णधार म्हणून 15 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या सामन्यांमध्ये नऊ विजय आणि चार पराभव पत्करले आहेत. रोहितची विजयाची टक्केवारी 69.23 आहे. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला असून जून महिन्यात तो टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

दुसरीकडे, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 60 झेल घेणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या (England) डावात मार्क वुडचा झेल घेत रोहितने हा विश्वविक्रम केला. रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटमधील हा 60 वा झेल होता. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 60 झेल घेतले आहेत. आता त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 60 झेल आहेत.

दरम्यान, आर अश्विनच्या चेंडूवर स्लिपमध्ये मार्क वुडचा झेल रोहितने घेतला आणि हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 60 किंवा त्याहून अधिक झेल घेतलेल्या खेळाडूंची यादी बरीच मोठी आहे, परंतु आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 60 किंवा त्याहून अधिक झेल घेतलेले फक्त सहा खेळाडू आहेत. उर्वरित पाच खेळाडूंबद्दल बोलायचे तर त्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये 60 किंवा त्याहून अधिक झेल घेतलेले नाहीत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय T20 मध्ये डेव्हिड मिलरच्या नावावर सर्वाधिक झेल आहेत, ज्याने एकूण 77 झेल घेतले आहेत. मिलरने एकही कसोटी सामना खेळलेला नाही आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 83 झेल घेतले आहेत.

दुसऱ्या स्थानावर मार्टिन गुप्टिल आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 68 झेल घेतले आहेत, तर त्याच्या खात्यात कसोटीत 50 आणि एकदिवसीय सामन्यात 104 झेल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर टीम साऊथी आहे, ज्याने 79 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय झेल घेतले आहेत.

यानंतर टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू मोहम्मद नबी आहे, ज्याने टेस्टमध्ये दोन, एकदिवसीयमध्ये 71 आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये 62 झेल घेतले आहेत. आयर्लंडच्या जॉर्ज डॉकरेलबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने कसोटीत एकही झेल घेतलेला नाही, तर त्याने 47 एकदिवसीय आणि 61 टी-20 आंतरराष्ट्रीय झेल घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT