Dhruv Jurel Debut Test Inning IND vs ENG Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: सर्फराजनंतर ध्रुव जुरेलने लुटली मैफील; पदार्पणातच भारतीय दिग्गजाचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला

Dhruv Jurel Debut Test Inning IND vs ENG: राजकोट कसोटीत टीम इंडियासाठी दोन खेळाडूंनी पदार्पण केले. प्रथम, सर्फराज खानने पदार्पणात 66 चेंडूत 62 धावांची खेळी खेळून चर्चेत आला.

Manish Jadhav

Dhruv Jurel Debut Test Inning IND vs ENG:

राजकोट कसोटीत टीम इंडियासाठी दोन खेळाडूंनी पदार्पण केले. प्रथम, सर्फराज खानने पदार्पणात 66 चेंडूत 62 धावांची खेळी खेळून चर्चेत आला. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलनेही टीम इंडियासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना धूम ठोकली. त्याचे अर्धशतक चार धावांनी हुकले पण त्याच्या 46 धावांच्या खेळीने चकित केले. या खेळीत ध्रुवने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने आपल्या खेळीदरम्यान मार्क वुडच्या चेंडूंचा ताशी 150 किमी वेगाने सामना केला आणि शानदार फलंदाजी केली.

दरम्यान, टीम इंडियासाठी 312 वा कसोटीपटू ठरलेल्या ध्रुव जुरेलने निश्चितपणे 46 धावा केल्या पण आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. या खेळीत त्याने 104 चेंडू खेळले. यादरम्यान त्याचा क्लास, त्याची आक्रमक खेळीसह सर्व काही पाहायला मिळाले. त्याच्या एका अप्पर कट षटकाराने उपस्थतिना चकित केले. मार्क वुडच्या एका चेंडूवर ध्रुवने ताशी 150 किमी वेगाने षटकार मारला.

तसेच, ध्रुव जुरेल कसोटी पदार्पणात भारतासाठी (India) सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. नयन मोंगिया 30 वर्षे या पोजिशनवर होता पण आता तो असा तिसरा फलंदाज ठरला तर ध्रुव जुरेल दुसरा फलंदाज. आगामी काळातही त्याने असाच खेळ करत राहिल्यास केएस भरतसाठी धोक्याची घंटा ठरु शकते. तसेच, ऋषभ पंतसाठी पुनरागमनही आव्हान ठरणार आहे.

पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक

दिलावर हुसेन- 59 धावा (इंग्लंड, 1934)

ध्रुव जुरेल- 46 धावा (इंग्लंड, 2024)

नयन मोंगिया- 44 धावा (श्रीलंका, 1994)

भारताने 445 धावा केल्या

दुसरीकडे, टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला 331 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ध्रुव जुरेलने रविचंद्रन अश्विनच्या साथीने संघाला संकटातून बाहेर काढले आणि 8व्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. यादरम्यान जुरेलची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. या दोघांच्या शानदार भागीदारीच्या जोरावर भारताची धावसंख्या 400 पार झाली. शेवटी जसप्रीत बुमराहनेही (Jasprit Bumrah) हिंमत दाखवत टीम इंडियाची धावसंख्या 445 पर्यंत नेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT