IND vs ENG: सर्फराज खानचा 'छोटा पॅकेट, बडा धमाका'; हार्दिक पांड्याच्या रेकॉर्डशी केली बरोबरी!

Sarfaraz Khan Debut Test Record: सर्फराज अखेर टीम इंडियात कधी प्रवेश करणार याची क्रिकेटप्रेमी गेल्या दोन वर्षांपासून वाट पाहत होते.
Sarfaraz Khan Debut Test Record
Sarfaraz Khan Debut Test RecordDainik Gomantak

Sarfaraz Khan Debut Test Record: सर्फराज खान... देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणारा फलंदाज. सर्फराज अखेर टीम इंडियात कधी प्रवेश करणार याची क्रिकेटप्रेमी गेल्या दोन वर्षांपासून वाट पाहत होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत त्याचा संघात समावेश तर झालाच पण पहिल्याच दिवशी त्याला फलंदाजीचीही संधी मिळाली. सर्फराज खानसाठी हा दिवस नेहमीच संस्मरणीय असेल. ज्या दिवशी त्याने पदार्पण केले त्याच दिवशी त्याने असा विक्रम केला ज्याचा कदाचित कोणी विचारही केला नसेल. त्याने हार्दिक पांड्याच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. मात्र, युवराजचा विक्रम मोडण्यास तो चुकला.

पहिल्याच कसोटीत सर्फराजने छाप सोडली

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शतक झळकावून बाद झाला तेव्हा सर्फराज खान क्रीजवर आला. संपूर्ण क्रिकेट विश्व या क्षणाची प्रतीक्षा करत होते, जो आता समोर होता. सर्फराजने पहिली धाव घेण्यासाठी काही चेंडू खेळले. त्याने पहिली धाव घेताच संपूर्ण स्टेडियममध्ये चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्फराज त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. प्रथम सावधगिरीने आणि नंतर त्याने काही विस्फोटक फटले मारले. सर्फराजने पदार्पणाच्या कसोटीतच कोणता विक्रम केला ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sarfaraz Khan Debut Test Record
IND vs ENG: तिसऱ्या कसोटीपूर्वी बदलले राजकोटमधील स्टेडियमचे नाव; जडेजा, पुजारासह सौराष्ट्रच्या खेळाडूंचाही सन्मान

सर्फराज खानने हार्दिक पांड्यासोबत बरोबरी साधली

पदार्पणाच्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सर्फराज खान आता संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हार्दिक पांड्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर सर्फराज खाननेही आज इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या बाबतीत पटियालाचा युवराज सिंग पहिल्या क्रमांकावर आहे. हा तो युवराज सिंग नाही, ज्याला तुम्ही ओळखता. हा भारतीय खेळाडू म्हणजे यादवेंद्र सिंग ऊर्फ प्रिन्स ऑफ पटियाला. ज्याने भारतासाठी (India) एकच कसोटी खेळली आणि त्यात विक्रम केला होता.

पटियालाचा यादवेंद्र सिंह उर्फ ​​युवराज कोण आहे?

यादवेंद्र सिंग यांनी 1934 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करताना त्यांनी एका सामन्यात 84 धावा केल्या होत्या. धावा करण्यासोबतच त्यांनी त्या सामन्यात दोन झेलही घेतले होते, पण त्यानंतर ते दुसरा सामना खेळू शकले नाही. 1913 मध्ये जन्मलेल्या यादवेंद्र सिंग यांचे 1974 मध्ये निधन झाले. आज बहुतेक लोकांना त्यांचे नाव देखील माहित नसेल. पण सर्फराजच्या रेकॉर्डमुळे त्यांची पुन्हा आठवण झाली.

Sarfaraz Khan Debut Test Record
IND vs ENG, 3rd Test: रोहित-जडेजाचा शतकी दणका, तर सर्फराजचीही आक्रमक फिफ्टी; पहिल्या दिवशी भारताच्या 300 धावा पार

सर्फराजने 66 चेंडूत 62 धावांची तूफानी खेळी खेळली

सर्फराजच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने शानदार फलंदाजी केली. मात्र, दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच रवींद्र जडेजासोबत धाव घेण्याबाबत झालेल्या गैरसमजामुळे तो धावबाद झाला. मात्र, पाहिल्यास यात जडेजाची चूक होती. जडेजा 99 धावांवर असताना तो धाव घेण्यासाठी धावला, पण त्याच दरम्यान चेंडू जवळ आल्याने जडेजाने पाय मागे खेचले, पण सर्फराजने क्रिझ सोडली होती, त्यामुळे तो धावबाद झाला. सर्फराजने बाद होण्यापूर्वी 66 चेंडूत 62 धावांची तूफानी खेळी खेळली. त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यावर तो कसा खेळतो हे पाहायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com