Abhishek Sharma Record Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: 785 चेंडू,100 षटकार... 20 चेंडूत अर्धशतक! अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Abhishek Sharma Record: भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात स्फोटक फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Sameer Amunekar

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात स्फोटक फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सुरुवातीला भारताचे दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. मात्र अशा परिस्थितीत अभिषेकने आक्रमक शैली कायम ठेवत इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली.

785 चेंडूत 100 षटकार; मोडला जागतिक विक्रम

या सामन्यात अभिषेक शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पूर्ण सदस्य देशांच्या खेळाडूंमध्ये सर्वात कमी चेंडूत 100 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केला. हा टप्पा गाठण्यासाठी त्याने अवघ्या 785 चेंडूंचा सामना केला.

याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज एविन लुईसच्या नावावर होता. लुईसने 789 चेंडूंमध्ये 100 षटकार पूर्ण केले होते. न्यूझीलंडचा फिन अॅलन, ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड, न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो आणि भारताचा सूर्यकुमार यादव हे देखील या यादीत अग्रस्थानी आहेत. मात्र सर्वात वेगाने हा पराक्रम करणारा फलंदाज म्हणून आता अभिषेक शर्माचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे.

भारतासाठी 100 षटकारांचा टप्पा गाठणारा पाचवा खेळाडू

या विक्रमासह अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा भारताचा पाचवा फलंदाज ठरला. याआधी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली होती. आता अभिषेकनेही या प्रतिष्ठेच्या यादीत स्थान मिळवत भारतीय क्रिकेटमधील आपल्या वाढत्या प्रभावाची जाणीव करून दिली आहे.

20 चेंडूत अर्धशतक; इंग्लंडमध्येही रचला नवा विक्रम

षटकारांचा विक्रम नोंदवण्याबरोबरच अभिषेकने आणखी एक मोठा पराक्रम केला. त्याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडच्या भूमीवर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला.

यापूर्वी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता. राहुलने 2018 मध्ये मँचेस्टर येथे 27 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. अभिषेकने ही कामगिरी सात चेंडू आधी पूर्ण करत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

तुफानी खेळीने जिंकली चाहत्यांची मने

अभिषेक शर्माने या सामन्यात केवळ 24 चेंडूत 59 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. आक्रमक फलंदाजी, वेगवान धावगती आणि संकटात संघाला सावरण्याची क्षमता यामुळे त्याची खेळी सामन्याचा निर्णायक क्षण ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT