Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये विराटने रचला रेकॉर्ड, सचिन-रोहितसारखे खेळाडू...!

IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे.

Manish Jadhav

IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला. मात्र तिसऱ्या कसोटीत खेळाला कलाटणी मिळाली आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

आता, चौथ्या आणि शेवटच्या सामन्याकडे लक्ष्य लागले आहे. या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. मात्र असे असतानाही विराटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

कोहलीचा 'विराट' विक्रम

विराट कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत झंझावाती शतके झळकावली होती, मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्याला कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावता आलेले नाही. पण विराटने क्षेत्ररक्षणात मोठा विक्रम केला आहे.

तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल घेणारा विराट आता पहिला खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी राहुल द्रविडने (Rahul Dravid) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल घेतले आहेत. कोहलीच्या नावावर आता 493 सामन्यात 300 झेल आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:

महेला जयवर्धने - 652 सामने, 440 झेल

रिकी पाँटिंग - 560 सामने, 364 झेल

रॉस टेलर - 450 सामने, 351 झेल

जॅक कॅलिस - 519 सामने, 338 झेल

राहुल द्रविड - 509 सामने, 334 झेल

स्टीफन फ्लेमिंग - 396 सामने, 306 झेल

विराट कोहली - 493* सामने, 300 झेल

ग्रीन-ख्वाजा खेळामुळे भारत अडचणीत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्याचा दोन दिवसांचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने 480 धावा फलकावर लावल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 180 धावांची खेळी केली.

त्याचवेळी, कॅमेरुन ग्रीननेही 114 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने 6 विकेट घेतल्या. यानंतर टीम इंडियानेही दिवसाअखेर बिनबाद 36 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा 17 आणि शुभमन गिल 18 धावा करुन नाबाद परतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

SCROLL FOR NEXT