America Israel Iran war impact | Goans stranded in Gulf countries
America Israel Iran war impact | Goans stranded in Gulf countries Dainik Gomantak

महत्वाची बातमी! युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या गोमंतकीयांना मिळणार मदत; भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Goans stranded in Gulf countries: अमेरिका, इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या गोमंतकीयांना मदत मिळेल, अशी व्यवस्था परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात येत आहे.
Published on

पणजी: अमेरिका, इस्त्राईल आणि इराण युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या गोमंतकीयांना सर्वतोपरी मदत मिळेल, अशी व्यवस्था परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने करण्यात येत आहे.

यासाठी सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे अनिवासी गोमंतकीयांसाठीचे आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. ते म्हणाले, आखाती देशात नेमके किती गोमंतकीय आहेत, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही.

खुद्द इराणमध्ये कितीजण असावेत, हेही सांगता येत नाही. माझ्या परिचयाची काणकोणमधील एक व्यक्ती इराणमध्ये होती. युद्धाची माहिती मिळाल्यावर त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता तिने, आपण दोन-तीन महिन्यांपूर्वी इराणमधून गोव्यात आल्याचे सांगितले. शिवाय अन्य दोन व्यक्तींनीही इराण सोडल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

America Israel Iran war impact | Goans stranded in Gulf countries
Ayatollah Khamenei: इराणमधून मोठी बातमी! सर्वोच्च नेते 'अयातुल्ला खामेनेई' यांचा मृत्यू; अधिकृत यंत्रणांनी केली निधनाची पुष्टी

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आयुक्तालयाशी संपर्कात असलेल्या गोमंतकीयांपर्यंत ती माहिती पोचवली जात आहे. केंद्र सरकारच्या संपर्कात राहून गोमंतकीयांच्या सुरक्षिततेसाठी शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

America Israel Iran war impact | Goans stranded in Gulf countries
Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

युद्धामुळे काणकोणात सतर्कता!

इराण आणि इस्राईल यांच्‍यात युद्ध पेटल्‍यामुळे जगभर चिंता व्‍यक्त करण्‍यात येत आहे. तसेच आवश्‍‍यक त्‍या ठिकाणी खबरदारीच्‍या उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. पाळोळे येथे इस्रायली लोकांचे प्रार्थनास्‍थळ असून, तेथे मोठ्या संख्‍येने हे लोक येतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com