

बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील बेकायदेशीरपणाच्या चौकशीदरम्यान निलंबित केलेल्या पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
त्यांची या विषयावरील चौकशी मात्र सुरूच राहणार आहे. हळर्णकर यांची गोवा गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नव्या जागी कार्मिक खात्याने अद्याप नियुक्ती दिलेली नाही.
बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर कारवाईचा पहिला बडगा तीन अधिकाऱ्यांवर उगारण्यात आला होता. त्यात या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. तिसरा तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर याला प्रथम निलंबित करण्यात आले आणि नंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
या प्रकरणात क्लबचा सहमालक अजय गुप्ता याला दिल्लीत पकडण्यात आले. त्यानंतर लुथ्रा बंधूंना थायलंडमधून हद्दपार करून भारतात आणण्यात आले आणि अटक करण्यात आली. गुप्ता याला जामीन मिळाल्यानंतर बर्चला परवाने देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा आरोप असलेला तत्कालीन सरपंच रोशन रेडकर व तत्कालीन पंचायत सचिव बागकर यांना जामीन मिळाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.