Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान आली 'ही' धक्कादायक बातमी, या व्यक्तीच्या...

IND vs AUS, 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

IND vs AUS, 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमधील एका हॉटेलमध्ये एका इंग्रजी दैनिकाच्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराचा मृत्यू झाला आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे प्राथमिक मत आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एमपीसीए) अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.

एमपीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘द हिंदू’चे वरिष्ठ उपसंपादक (क्रीडा) एस. दिनाकर (57) सोमवारी विजय नगर भागातील एका हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांना (Doctors) प्रथमदर्शनी वाटते की, दिनाकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा. पोलीस उपायुक्त (डीसीपी) संपत उपाध्याय म्हणाले की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराच्या मृत्यूची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपण या प्रकरणी सर्व काही सांगू.

दरम्यान, दिनाकर यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, दिनाकर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेचा भाग म्हणून इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे वार्तांकन करत होते. तसेच, 9 मार्चपासून सुरु होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी ते अहमदाबादमध्ये उपस्थित असतील, असे सांगण्यात आले होते.

या व्यक्तीच्या अचानक मृत्यूने घबराट निर्माण झाली

सहकाऱ्याने सांगितले की, दिनाकर मंगळवारी सकाळी इंदूरहून अहमदाबादला जाणार होते. त्यांनी पुढे सांगितले की, दिनाकर यांच्या शोकाकुल कुटुंबात त्यांचे वृद्ध वडील आहेत. क्रिकेटसाठी जगभर प्रवास करणारे दिनाकर मृत्यूपूर्वी या खेळाबद्दल लिहीत होते.

इंदूरच्या होळकरकालीन क्रिकेटच्या (Cricket) वारशावर लक्ष केंद्रित करणारा त्यांचा शेवटचा लेख त्यांच्या मीडिया संस्थेने मंगळवारी त्यांच्या निधनाच्या बातमीसह प्रकाशित केला.

कुटुंबात शोक

दिनाकर यांना श्रद्धांजली वाहताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय जगदाळे म्हणाले की, "दिनाकर यांनी सोमवारीच माझ्याशी इंदूरच्या माजी होळकर शासकांच्या क्रिकेट संघाच्या खेळाच्या आक्रमक शैलीबद्दल बोलले होते."

जगदाळे यांनी सांगितले की, 'दिनाकर मुलाखतीसाठी मला भेटायला येणार होते, मात्र त्यांनी नंतर माझ्याशी फोनवरच बोलायचे ठरवले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT