IND vs AUS: फक्त ऑस्ट्रेलियाच नाही, मुंबई इंडियन्सलाही धक्का! 'हा' धाकड खेळाडू भारत दौऱ्यातून बाहेर

भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बाहेर झाला आहे, तो आगामी आयपीएलमध्ये आता मुंबईकडून खेळण्याचीही शक्यता कमी आहे.
India vs Australia
India vs AustraliaDainik Gomantak

Jhye Richardson: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारतीय दौऱ्यावर असून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका 13 मार्चला संपणार आहे. त्यानंतर 17 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. पण या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याला नुकतीच एक स्थानिक सामना खेळताना पुन्हा एकदा हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.

त्याला यापूर्वी जानेवारीमध्ये बिग बॅश लीग खेळत असताना ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्यातून पूर्ण सावरण्यासाठी त्याला दोन महिने लागले. त्यामुळे त्याला बीबीएलच्या अंतिम सामन्यातही खेळता आले नव्हते. तो तेव्हापासून कोणताही देशांतर्गत सामनाही खेळला नव्हता.

India vs Australia
IND vs AUS: स्मिथ की कमिन्स, चौथ्या कसोटीत कोण करणार ऑस्ट्रेलियाची 'कॅप्टन्सी'? मोठी अपडेट आली समोर

पण, तरी त्याची ऑगामी वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली होती. मात्र, मैदानात उतरल्यानंतर पुन्हा एकदा दुखापतीला सामोरे जावे लागले असून त्याला आता यातून सावरण्यासाठी बराच काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

रिचर्डसन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुखापतींनी सामना करत आहे. यापूर्वी त्याला खांद्याच्या दुखापतीनेही बराच काळ त्रस्त केले होते. त्याने आत्तापर्यंत 3 कसोटी, 15 वनडे आणि 18 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये मिळून त्याने 57 विकेट्स घेतल्या आहेत.

(Australia's Jhye Richardson has been ruled out of ODI Series against India)

India vs Australia
IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत 'या' खेळाडूला नक्की संधी मिळणार, द्रविडने दिला इशारा!

त्याच्याऐवजी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झालेल्या एलिसने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 3 आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्सलाही धक्का

झाय रिचर्डसन आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याला मुंबईने दीड कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण आता त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो या हंगामात खेळण्याची शक्यता कमी आहे. आधीच मुंबईला जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या आयपीएल हंगामातून बाहेर पडल्याने धक्का बसला आहे, त्यातच आता पुन्हा रिचर्डसनही आयपीएल 2023 ला मुकण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com