India vs Australia 4th Test, Rohit Sharma Decision: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांनंतर मालिकेत 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. इंदूरमध्ये यजमानांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत पहिला विजय नोंदवला.
आता, या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान, अनेक क्रिकेट चाहत्यांना प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल अपेक्षित आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे.
तत्पूर्वी, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (India) 9 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाला त्या सामन्याच्या पहिल्या डावात फक्त 109 धावा करता आल्या होत्या तर दुसऱ्या डावात 163 धावा.
त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशीच सामना संपवला. विशेष म्हणजे, आतापर्यंत मालिकेतील तिन्ही सामने 3-3 दिवसांत संपले होते.
अहमदाबाद कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठा निर्णय घेऊ शकतो. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय ठरु शकतो. तो आपल्याच संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला वगळू शकतो. याचे कारण विराटचे आकडे. मालिकेत आतापर्यंत त्याची बॅट शांत राहिली आहे.
एवढेच नाही तर, कसोटी कारकिर्दीतील त्याचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये आले होते, जेव्हा त्याने बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर 136 धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्याला या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये एकही मोठी इनिंग खेळता आलेली नाही.
विराट कोहली (Virat Kohli) या मालिकेतही काही विशेष करु शकला नाही. त्याला 3 सामन्यांच्या 5 डावात केवळ 111 धावा करता आल्या आहेत. नागपूर कसोटीत त्याने केवळ 12 धावा केल्या.
यानंतर, त्याने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच दिल्लीवर दोन्ही डावात एकूण 64 धावा (44, 20) केल्या. इंदूरमधील मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली. त्याला दोन डावांत 22 आणि13 धावा करता आल्या.
34 वर्षीय विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 107 कसोटी, 271 एकदिवसीय आणि 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 8230 धावा, एकदिवसीय सामन्यात 12809 धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4008 धावा केल्या आहेत.
विराटच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10479 धावा आहेत तर लिस्ट A क्रिकेटमध्ये 14251 धावा आहेत. एकूण T20 कारकिर्दीत विराटने आतापर्यंत 11326 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्मासाठी हा निर्णय घेणे सोपी गोष्ट असणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.