Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाचा 'हा' सुपरस्टार लवकरच मैदानात परतणार, ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ!

India vs Australia Tests, Jasprit Bumrah Comeback: भारतीय संघाने पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात आणि नंतर टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला.

दैनिक गोमन्तक

India vs Australia Tests, Jasprit Bumrah Comeback: भारतीय संघाने पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात आणि नंतर टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला. आता त्यांना ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असणार आहे. उभय संघांमध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, जी 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

दरम्यान, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाच्या एका सुपरस्टार वेगवान गोलंदाजाने मैदानात परतण्याची तयारी सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हा खेळाडू मैदानात पाहायला मिळेल, अशी आशा आहे.

बुमराह पुनरागमन करेल

भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळताना दिसू शकतो.

बुमराहने बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. आता पाठदुखीचा त्रास जाणवत नसल्यास बुमराह आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळेल अशी शक्यता आहे.

बुमराह सध्या बंगळुरुमध्ये आहे

29 वर्षीय बुमराह सध्या बंगळुरुमध्ये असून एनसीएमध्ये त्याचे रिहॅब सुरु आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर गेला आहे. तो शेवटचा सप्टेंबर-2022 मध्ये भारतीय संघाच्या जर्सीत दिसला होता.

WTC फायनलसाठी मालिका महत्त्वाची आहे

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होणार आहे.

या मालिकेतील पुढील तीन कसोटी सामने दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सर्व सामने जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC फायनल) अंतिम फेरीत पोहोचणे निश्चित होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT