Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सूर्या दिल्ली कसोटीत खेळणार नाही? राहुल द्रविड यांचा खुलासा

Suryakumar Yadav: भारतीय संघ 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.

Manish Jadhav

India vs Australia, Coach Dravid on Suryakumar Yadav: भारतीय संघ 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याची तयारी जोरात सुरु आहे. दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिल्ली कसोटीच्या प्लेइंग-11वर भाष्य केले. श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबतही त्यांनी माहिती दिली.

द्रविड यांनी निदर्शनास आणून दिले

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी बुधवारी सांगितले की, 'मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाच दिवसांच्या सामन्यातील वर्कलोड हाताळण्याच्या स्थितीत असल्यास त्याच्या मागील कामगिरीच्या आधारे कसोटी संघात “परत” येईल.'

दरम्यान, गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. गेल्या एक महिन्यापासून त्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) रिहॅबिलिटेशन सुरु होते. या दुखापतीमुळे त्याला मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळू शकले नाही.

सूर्यकुमारला डच्चू?

नागपुरातील मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयसच्या जागी सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. श्रेयस अय्यर संघात परतला तर सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात येईल.

द्रविड पुढे म्हणाले की, 'दुखापतीतून सावरल्यानंतर एखाद्याने पुनरागमन करणे केव्हाही चांगले असते. दुखापतींमुळे कोणताही खेळाडू गमावणे आम्हाला आवडत नाही आणि ते कोणत्याही संघासाठी चांगले नाही. या प्रकरणी आम्ही सराव सत्रानंतर निर्णय घेऊ.' गुरुवारी दुसऱ्या आणि शेवटच्या सराव सत्रानंतर द्रविड आणि संघाचे वैद्यकीय पथक अय्यरच्या मॅच फिटनेसचे मूल्यांकन करतील.

द्रविड पुढे म्हणाले की, 'अय्यरने आज थोडा सराव केला आहे. आम्ही उद्या पुन्हा त्याचे मूल्यांकन करु आणि त्याला कसे वाटते ते पाहू. जर तो यासाठी तयार असेल तर त्याला संघात स्थान मिळेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GST on Sports: क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी, सामने पाहणं आणखी महाग होणार, तिकिटांच्या किमतींवर इतका GST आकारला जाणार

Sara Tendulkar Relationship: भावा पाठोपाठ बहीण पण उरकणार साखरपुडा? सचिनच्या लेकीचा Mistry Boy कोण, गोव्यातील फोटो VIRAL

'खुनी हनिमून' ते 'छावा' गोव्यात मांडवीच्या पाण्यावर रंगला अनोखा गणेश विसर्जन सोहळा; युनिक सांगोडोत्सव पहावाच लागतोय Watch Video

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

SCROLL FOR NEXT