BCCI Under 19 W Dainik Gomantak
क्रीडा

BCCI Under 19 W: देहरादून दौऱ्यासाठीच्या गोवा संघात 'मुरगाव'चे वर्चस्व

महिला संघात निवड झाल्याने आनंद पालकात आनंदाचे वातावरण

दैनिक गोमंतक

वास्को: भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे ( बीसीसीआय ) 19 वर्षीय महिला क्रिकेट एक दिवसीय स्पर्धा देहरादून (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात आली आहे. यात गोवा क्रिकेट संघटनेचा महिला संघ सहभागी झाला असून, या संघामध्ये गोव्याचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या चार महिला खेळाडू मुरगाव तालुक्यातील असल्याने हा आमच्यासाठी आनंदीय क्षण असल्याची प्रतिक्रीया युवा उद्योजक राघोबा कोटकर यांनी दिली आहे.

(Inclusion of four players from Mormugao taluk in Goa Cricket Association women's team)

मुरगाव जेटी येथील सामान्य परिवारातील मुलगी पुजा अजयसिंह यादव यांनी प्राथमिक शिक्षण मुरगाव हायस्कूल सडा येथे घेतले. सध्या ती सडा येथील दिपविहार उच्च माध्यमिकमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. वास्को बायणा एमपीटी मैदानावर एस.एन. क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक माजी रणजी क्रिकेटपटू निलेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे शिक्षण घेत आहे.

या क्रिकेट अकादमीत अंडर 19 वर्षीय महिला संघातील हर्षदा कदम, आराधना यादव शिक्षण घेत आहे. मुरगाव बंदरात खाजगी कंपनीत काम करून पुजा यांचे वडील अजय सिंह यादव यांनी आपल्या मुलीला कधीच क्रिकेट पासून दूर ठेवले नाही. मुरगाव जेटी येथील आदर्श स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबतर्फे दरवर्षी वास्को बायणा एमपीटी मैदानावर मुरगाव बंदरातील खाजगी कंपनीच्या कामगारांना क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते.

यात प्रत्येक संघात दोन महीला क्रिकेट खेळाडूचा समावेश असतो. या स्पर्धेत पुजा यादव आवर्जुन भाग घेते. कारण यातील एका कंपनीत त्यांचे वडील काम करीत आहेत. आदर्श स्पोट्स अँड कल्चरल क्लबचे अध्यक्ष राघोबा कोटकर यांनी पुजा यादव यांची गोवा क्रिकेट संघटनेच्या अंडर 19 वर्षीय महिला संघात निवड झाल्याने आनंद व्यक्त करून पालकांनी खास करून आपल्या मुलीना क्रिडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहीजे.

मुरगाव तालुक्यातील पुजा अजयसिंह यादव, हर्षदा कदम, आराधना सरोज व हर्षिता कमला प्रसाद यादव या महीला क्रिकेट पटूनी आपल्या आई वडीलाबरोबर शालेय शिक्षक, क्रिकेट प्रशिक्षकांचे नाव उज्वल केले असल्याची माहिती कोटकर यांनी दिली.

मुरगाव तालुक्यातील आल्तो दाबोळी येथील रहिवाशी तथा चिखली पंचायतीचे सरपंच कमला प्रसाद यादव यांची मुलगी हर्षिता कमला प्रसाद यादवने, सुद्धा क्रिकेट मधून आपली कारकीर्द सुरू करून गोवा क्रिकेट संघटनेच्या 19 वर्षीय महिला संघात स्थान मिळवून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. हर्षिता बैंगलोर येथील जस्ट क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.तसेच त्याचे बंधू वीर कमला प्रसाद यादव देखिल जस्ट क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.

चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव यांनी आपल्या मुलीची गोवा क्रिकेट संघात निवड झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. गोवा महिला क्रिकेट संघाचा पहिला एक दिवसीय सामना 7 डिसेंबर रोजी विदर्भ संघाविरुद्ध होणार आहे. 8 डिसेंबर मध्यप्रदेश, 10 डिसेंबर अरुणाचल प्रदेश, 12 डिसेंबर महाराष्ट्र, 14 डिसेंबर पॉडीचेरी संघाबरोबर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT