बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला यजमानांविरुद्ध दुसरा वनडे सामना बुधवारी खेळायचा आहे. हा सामना ढाकामधील शेर बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरुवात होईल.
दरम्यान भारतासाठी या सामन्यात मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे. कारण, पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशने रोमांचकरित्या एका विकेटने विजय मिळवला होता. त्यामुळे बांगलादेशने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे जर भारताला (Team India) आपले आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर दुसरा वनडे सामना जिंकावा लागेल. तर बांगलादेश (Bangladesh Cricket Team) दुसरा वनडे सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या प्रयत्नात असेल.
या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकून पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना अस्वस्थ दिसत होता. त्यामुळे कदाचीत त्याला छोटी दुखापत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असेल, तर उमरान मलिकला त्याच्या जागेवर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
बाकी पहिल्या सामन्यात खेळलेले खेळाडूच दुसऱ्या वनडेतही खेळताना दिसण्याची शक्यता दाट आहे. पण तरी हे पाहाणे महत्त्वाचे राहिल की यष्टीरक्षणासाठी इशान किशनचा पर्याय निवडला जाणार की नाही. कारण पहिल्या वनडेत केएल राहुलने फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळली होती.
पण, जर दुसऱ्या वनडेत इशान किशनला संधी मिळाली, तर एका गोलंदाजाला 11 जणांमधील जागा गमवावी लागू शकते किंवा केएल राहुलला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. पण केएल राहुलने फलंदाजीत आपला चांगला फॉर्म दाखवला असल्याने तो खेळण्याची शक्यता जास्त आहे.
दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभावित 11 जणांचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर/उमरान मलिक, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.