Suryakumar Yadav: भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने कारकिर्दीतील तिसरे टी-20 शतक झळकावले. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्या पुढे आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.
दरम्यान, सूर्यकुमारची ही खेळी पाहून प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळीही चाहत्यांपासून क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत त्याचे कौतुक करताना थकत नाही. या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्टचेही नाव जोडले गेले आहे. त्याने सूर्यकुमारचे कौतुक केले आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सेटअपवर टीका केली.
तसेच, पाकिस्तानचा माजी फलंदाज समलान बट्टने सूर्यकुमारला भाग्यवान म्हटले आहे. तो भारताकडून क्रिकेट खेळत आहे. जर तो पाकिस्तानकडून खेळत असता तर पाकिस्तानच्या अशा धोरणाचा तो बळी ठरला असता, ज्यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना संघात स्थान मिळत नाही.
शिवाय, सलमान बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, “सूर्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला जेव्हा त्याने 30 (वय) ओलांडली होती. मला वाटले की, तो भाग्यवान आहे. तो भारतीय आहे. तो पाकिस्तानात असता तर तो धोरणाचा बळी ठरला असता.''
त्याशिवाय, सूर्यकुमारने वयाच्या 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2021 मध्ये, त्याने इंग्लंडविरुद्ध पहिला T20 सामना खेळला. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.