Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

ICC Ranking: शुभमनला मागे सोडत बाबर आझम पुन्हा वनडेत नंबर वन; रवी बिश्नोईची T20 मधील बादशाहत संपुष्टात

Manish Jadhav

ICC Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) ने बुधवारी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये मोठे फेरबदल दिसून आले. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा वनडेत पहिल्या क्रमांकावर आला. भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलला मागे टाकून त्याने अव्वल क्रमांक पटकावला. बाबरचे 824 रेटिंग गुण आहेत. तर, गिल 810 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विराट कोहली (775) तिसऱ्या आणि रोहित शर्मा (775) चौथ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात संपलेल्या विश्वचषक 2023 नंतर तिन्ही भारतीय खेळाडूंनी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

दरम्यान, गिलने विश्वचषकादरम्यान बाबरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे पण गिल, कोहली आणि रोहित संघात नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेन (एका स्थानाने घसरुन आठव्या स्थानावर) आणि हेन्रिच क्लासेन (एक स्थानाने घसरुन 10व्या स्थानावर) यांना नुकसान झाले आहे. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत आयर्लंडचा हॅरी टेक्टर सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

त्याचवेळी, T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची बादशाहत संपुष्टात आली. इंग्लंडचा स्टा गोलंदाज आदिल रशीद अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचे 715 गुण आहेत. रशिदने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत 6 विकेट घेतल्या होत्या. बिष्णोईला दोन अंकाचा फटका बसला आहे. त्याची 685 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. नंबर वन गोलंदाज बनल्यानंतर तो एकही सामना खेळला नाही. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (692) दुसऱ्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा (679) चौथ्या आणि महिश तिक्षणा (670) पाचव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, सूर्यकुमार यादव (887) सर्वात लहान फॉरमॅटच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात झंझावाती शतक झळकावले होते. पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (787) दुसऱ्या स्थानावर आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम (755) तिसऱ्या स्थानावर आहे. पर्थमध्ये पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दमदार विजयानंतर कसोटी क्रमवारीत थोडा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने बाबरला मागे टाकले आहे. बाबर पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नर (27 व्या स्थानावर) आणि मिचेल मार्श यांनाही फायदा झाला आहे. केन विल्यमसन अव्वल स्थानी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT