New Zealand Cricket Team ICC
क्रीडा

NZ vs SL: पाऊस पुन्हा करणार न्यूझीलंडचा स्वप्नभंग? कसे असेल हवामान अन् समीकरण, वाचा

New Zealand vs Sri Lanka, World Cup: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी बंगळुरुला न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात अखेरचा साखळी सामना होणार आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Sri Lanka, Bengaluru Weather Update:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अखेरचे साखळी सामने आहेत. दरम्यान हा सामना न्यूझीलंड संघासाठी उपांत्य फेरीतील जाण्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, या सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता दाट आहे. बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसात पावसाचे वातावरण राहिले आहे.

4 नोव्हेंबरला बंगळुरूलाच झालेल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यातही पावसाचा अडथळा आला होता. त्यामुळे पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला होता.

दरम्यान, आता गुरुवारी देखील बंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे. गुरुवारी बंगळुरुमधील उष्णता 27 डिग्री सेल्सियसच्या आसपास असू शकते.

तसेच हवामान अंदाजानुसार दिवसभरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही 50 टक्क्याहून अधिक आहे. त्यामुळे जर पावसाचा जोर कायम राहिला, तर हा सामना रद्दही होऊ शकतो किंवा सामन्यातील षटके कमी केली जाऊ शकतात.

न्यूझीलंडला टेंशन

पावसाच्या शक्यतेमुळे मात्र, न्यूझीलंडवर मोठा दबाव असणार आहे. कारण श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला 10 गुण मिळवून उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर दावा मजबूत करता येणार आहे.

मात्र, जर त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, किंवा सामना पावसामुळे रद्द झाला, तर मात्र न्यूझीलंडला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या अखेरच्या साखळी फेरीतील सामन्यातील निकालावर अवलंबून राहावे लागेल.

इतकेच नाही, तर न्यूझीलंडला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पराभवाचीच आशा करावी लागणार आहे. जर यांच्यापैकी एकाने किंवा दोन्ही संघांनी विजय मिळवला, तर न्यूझीलंडचे उपांत्य फेरीत पोहचण्याचे स्वप्न भंगेल.

तसेच सलग तिसऱ्यांदा न्यूझीलंडचे विजेतेपदाच्या जवळ येऊन जिंकण्याच्याही स्वप्नांना धक्का लागेल. कारण न्यूझीलंडने 2015 आणि 2019 वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद पटकावले आहे.

श्रीलंकेसाठीही महत्त्वाचा सामना

श्रीलंकेचे आव्हान जरी या स्पर्धेतील संपले असले, तरी त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पोहचण्याच्या दृष्टीनेही हा सामना महत्त्वाचे असेल.

सध्या श्रीलंका गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहे. मात्र, वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील गुणतालिकेत पहिल्या 8 क्रमांकावर राहणारे संघच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. अशात पहिल्या 8 मध्ये येण्यासाठी श्रीलंका प्रयत्न करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT