World Cup 2023: 'भारत-पाकिस्तान सेमीफायनल होऊ शकते, पण...', मोहम्मद कैफची मोठं वक्तव्य

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकप 2023 स्पर्धेत जर उपांत्य सामना झाला तर काय होऊ शकते, याबद्दल मोहम्मद कैफने प्रतिक्रिया दिली आहे.
India vs Pakistan
India vs PakistanX/ICC

Mohammad Kaif reacted on if Pakistan play against India in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. तसेच भारताचे गुणतालिकेतील अव्वल स्थानही पक्के आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांना उपांत्य सामना गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाशी खेळायचा आहे.

दरम्यान, सध्या उपांत्य फेरीत जाण्यासाठी उर्वरित दोन जागांसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये चूरस आहे. त्याचही ऑस्ट्रेलियाचे स्थानही जवळपास पक्के आहे. मात्र, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात अटीतटीची शर्यत आहे.

जर पाकिस्तानने उपांत्य फेरीत स्थान मिळवले, तर ते चौथ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ उपांत्य फेरीत आमने-सामने येऊ शकतात. याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

India vs Pakistan
World Cup 2023: श्रीलंकेचा बांगलादेशशी हस्तांदोलन करण्यास नकार! मॅथ्यूजनं सांगितलं, 'कारण त्यांनी आम्हाला...'

कैफने म्हटले आहे की जर पाकिस्तान उपांत्य फेरीत आले, तर सामना एकतर्फी होईल. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कैफ म्हणाला, 'ते उपांत्य फेरीत पोहचू शकतात. पण मग हा सामना एकतर्फी होईल. मी जर इतिहासातील पाने उघडली तर दिसते काय घडले आहे. भारताने त्यांना सहज पराभूत केले आहे.

'तथापि, पाकिस्तानला संधी आहे, जर त्यांनी चांगला सामना खेळला आणि इंग्लंडला पराभूत केले, तर नेट रनरेटची समस्या आहे, त्यामुळे त्यांना मोठ्या विजयासह तिथे पोहोचावे लागेल.'

पाकिस्तानला वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध 11 नोव्हेंबर रोजी खेळायचा आहे.

दरम्यान, हा सामना तर त्यांना जिंकावा लागेलच, पण त्याचबरोबर हा सामना होण्यापूर्वीच त्यांना ही आशा करावी लागणार आहे की अफगाणिस्तानने त्यांचे साखळी फेरीतील दोन्ही सामने पराभूत व्हावेत, तसेच न्यूझीलंडनेही श्रीलंकेविरुद्ध 9 नोव्हेंबर रोजी पराभव स्विकारावा.

त्याचबरोबर आपल्या उपांत्य फेरीतील जाण्यासाठी त्यांना नेटरनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे.

पाकिस्तानने सध्या 8 सामन्यांमधील 4 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने पराभूत झाले आहेत.

India vs Pakistan
India vs Pakistan: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! नो-बॉलवर विकेट अन्...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे वर्ल्डकपमधील आमने-सामने आकडेवारीबद्दल सांगायचे झाले, तर हे दोन संघ आत्तापर्यंत वर्ल्डकपमध्ये 8 वेळा आमने-सामने आले आहेत. या आठही वेळेस भारताने विजय मिळवला आहे.

भारताचा 2023 वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादमध्ये सामना झाला होता, ज्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच यापूर्वी 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com