India vs Pakistan | Sachin Tendulkar ICC
क्रीडा

IND vs PAK: अन् स्टेडियममध्ये पुन्हा घुमला 'सचिन...सचिन'चा गजर, ICC ने शेअर केला खास व्हिडिओ

Sachin Tendulkar: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी सचिन तेंडुलकर वर्ल्डकप ट्रॉफी मैदानात घेऊन आला होता.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Sachin Tendulkar:

शनिवारी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी उपस्थित होते, यामध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होता.

खरंतर दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेचा ब्रँडअँबेसिडर आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू होण्याच्या आधी सचिन वर्ल्डकपची ट्रॉफी मैदानात घेऊन आला होता.

यावेळी जेव्हा तो ट्रॉफी मैदानात आणत होता, त्यावेळी संपूर्ण स्टेडियममधून 'सचिन...सचिन' असा गरज ऐकायला मिळाला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.

तिथे जवळपास सव्वालाख लोक एकत्र सामना पाहू शकतात आणि शनिवारी सामन्यासाठी या स्टेडियममध्ये लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. अशात सचिन...सचिन नावाचा गजर मोठ्या प्रमाणात ऐकू येत होता. या क्षणांचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की सचिन ट्रॉफी मैदानात घेऊन येताना म्हणतो की 'आशा आहे १९ नोव्हेंबरला देखील मी ही ट्रॉफी येथे घेऊन येईल.' वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादलाच होणार आहे.

तसेच ट्रॉफी घेऊन आल्यानंतर मैदानात दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाले. याबद्दल सचिन म्हणाला, 'ते क्षण अंगावर काटा आणणारे होते. स्टेडियमच्या मध्ये उभे राहिल्यानंतर राष्ट्रगीत गाता, तेव्हा खूप छान वाटते. त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नसू शकते. मला ट्रॉफी घेऊन जाण्याचीही संधी मिळाली. मी जेव्हाही स्टेडियममध्ये जातो, तेव्हा नेहमीच अविश्वसनीय अनुभव मिळतो. लोक भारताला पाठिंबा देत असतात, चिअर करत असतात.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ 42.5 षटकांमध्ये 191 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT