Marnus Labuschagne | WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

Marnus Labuschagne: 'तेव्हा मी फक्त...', लॅब्युशेनने सांगितलं सिराज वॉर्नरची विकेट घेताना झोपण्यामागचं कारण

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये वॉर्नर बाद झाला तेव्हा झोपण्यामागचे कारण लॅब्युशेनने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Marnus Labuschagne on taking a power nap: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारपासून (7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया संघात सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेन त्याच्या फलंदाजीपूर्वी झोपला असल्याची एक गमतीशीर गोष्ट पाहायला मिळाली होती. त्याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

झाले असे की भारतीय संघाचा पहिला डाव 296 धावांवर संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाकडून दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेनला झोप लागली असल्याचे दिसले होते.

लॅब्युशेनने डोळे मिटलेले असतानाच अचानक चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला चकवले. वॉर्नर 1 धावेवर असताना त्याचा झेल यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतने घेतला. त्यामुळे भारतीय संघाने जल्लोष केला.

पण याचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये डोळे मिटून पडलेला लॅब्युशेन मात्र दचकून उठला आणि त्याच्या लक्षात आले की वॉर्नर बाद झालाय, त्यामुळे त्याला फलंदाजीला जायचे आहे. त्यामुळे तो उठून फलंदाजीला जाण्यासाठी तयार झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर लॅब्युशेनने या घटनेबद्दल सांगितले की 'मी फक्त त्यावेळात माझ्या डोळ्यांना विश्रांती देत होतो आणि आराम करत होतो. मी स्वत:ला थोडे शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. कारण तुम्ही पूर्ण वेळ सामना पाहू शकत नाही. मी तेव्हा उठलो आणि लवकरच जागाही झालो. जेव्हा सिराजने पहिला दणका दिला, तेव्हा मला खूप वेळ आराम मिळाला नाही.'

लॅब्युशेन फलंदाजीला आल्यानंतर सिराजने त्याला संघर्ष करायला लावले होते. लॅब्युशेनच्या हाताला दोनदा चेंडूही लागला, तो एका जमीनीवरही कोसळला. पण असे असले तरी, लॅब्युशेनने झुंज देत तिसऱ्या दिवसाखेपर्यंत 41 धावांवर नाबाद राहिला.

या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 44 षटकात 4 बाद 123 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या दिवसाखेर मार्नस लॅब्युशेनसह कॅमेरॉन ग्रीन 7 धावांवर नाबाद आहे.

तसेच पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलिया 296 धावांनी पुढे आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

'Mhaje Ghar Yojana: 'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका!- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT