WTC 2023 Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केली चेंडूशी छेडछाड? माजी क्रिकेटपटूच्या आरोपाने उडवली खळबळ

माजी क्रिकेटपटूने कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
Australia | WTC 2023 Final
Australia | WTC 2023 FinalDainik Gomantak
Published on
Updated on

Allegation of Ball tampering in WTC 2023 Final, India vs Australia: बुधवारपासून (7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने केला आहे.

52 वर्षीय अलीने अंतिम सामन्यात वापरण्यात येत असलेला ड्यूक चेंडू कमीत कमी 40 षटकांपर्यंत रिव्हर्स स्विंग होत नाही, पण ऑस्ट्रेलियाच्या संघाला 15 व्या षटकानंतरच रिव्हर्स मिळायला लागल्याचा आरोप केला आहे.

याशिवाय अलीने पंच आणि समालोचकांवरही याबद्दल काहीही न बोलण्याबद्दल तक्रार केली आहे. त्याने याबद्दल पुर्ण स्पष्टीकरणही दिले आहे.

Australia | WTC 2023 Final
WTC 2023 Final: रहाणेनं 512 दिवसांनी कमबॅकच केलं नाही, तर 'हा' रेकॉर्डही केला नावावर; धोनीलाही टाकलं मागे

अलीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की 'पहिल्यांदा, जे समालोचक कक्षातून सामना पाहात आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवेल. ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे चेंडूबरोबर काहीतरी केले आहे आणि तरीही कोणीही त्याबद्दल बोलत नाहीये. कोणत्याही फलंदाजाला प्रश्न पडला नाही की काय होत आहे. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे फलंदाज चेंडू सोडताना त्रिफळाचीत होत आहेत.'

'मी तुम्हाला पुरावाही देतो. 54 व्या षटकापर्यंत जेव्हा शमी गोलंदाजी करत होता, तेव्हा चमक बाहेर होती आणि चेंडू स्मिथसाठी आत आला. त्याला रिव्हर्स स्विंग म्हणत नाही. रिव्हर्स स्विंग तेव्हा होतो, जेव्हा चमक आतल्या बाजूला असते आणि चेंडू आत आला असेल.'

अलीने असेही म्हटले की भारताच्या डावातील 16 ते 17 षटकात चेंडू छेडछाड झाली आहे. 18 व्या षटकात पंच रिचर्ड केटलबोरो यांच्या सांगण्यानुसार चेंडू योग्य आकारात नसल्याने बदलण्यात आला.

Australia | WTC 2023 Final
WTC 2023 Final मध्ये खेळण्यासाठी हार्दिकला विचारण्यात आले होते, पण..., पाँटिंगने केला मोठा खुलासा

अली म्हणाले, 'भारताच्या डावातील 16, 17 आणि 18 वे षटक पाहा, ज्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला, चेंडूची चमक पाहा. मिचेल स्टार्कच्या हातात चेंडू होता आणि चेंडूची चमक असलेली बाजू बाहेरच्या बाजूला होती. पण तरी दुसऱ्या बाजूने चेंडू वळला. जडेजा चेंडूला ऑन साईडला मारत होता, पण चेंडू पाँइंटच्या दिशेने जात होता. पंच आंधळे आहेत का? देवालाच माहित की तिथे कोण-कोण बसले आहेत, ज्यांना एवढीही गोष्ट कळाली नाही.'

दरम्यान, या सामन्यात पहिल्या तीन दिवसात तरी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. त्यानंतर भारताचा पहिला डाव 296 धावांवर संपला.

साल 2018 मध्येही झालेले चेंडू छेडछाड प्रकरण

साल 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ चेंडू छेडछाड प्रकरणात अडकला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत चेंडू छेडछाड झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे त्यावेळचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली, तसेच कॅमेरॉन ग्रीनवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आलेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com