Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw: 'मी पुजारा सरांसारखी बॅटिंग करू शकत नाही आणि ते...', पृथ्वी शॉचे मोठे भाष्य

Pranali Kodre

'I can’t bat like Cheteshwar Pujara', said Prithvi Shaw: भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ जवळपास गेल्या दोन वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे. शॉ याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात शतकाने केली होती. पण त्याला संघात स्थान पक्के करण्यात अपयश आले. दरम्यान, त्याने म्हटले आहे की तो आक्रमक खेळूनच पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.

शॉ अखेरीस श्रीलंकेविरुद्ध जुलै 2021 मध्ये टी20 सामन्यात भारताकडून खेळला आहे. तो सध्या पश्चिम विभागाकडून दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. दुलीप ट्रॉफीमधील पश्चिम विभागाचा मध्य विभागाविरुद्धचा उपांत्य सामना अनिर्णत राहिल्यानंतर शॉ याने त्याच्या खेळाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

शॉ म्हणाला, 'वैयक्तिकदृष्ट्या, मला वाटत नाही की मला माझा खेळ बदलायला हवा. पण नक्कीच मी आत्ता खेळत आहे, त्यापेक्षा अधिक समजदारपणे खेळायला हवे. मी पुजारा सरांसारखी फलंदाजी करू शकत नाही आणि पुजारा सर माझ्यासारखी फलंदाजी करू शकत नाही.'

'त्यामुळे मला ज्या गोष्टींनी इथपर्यंत आणले, त्याच गोष्टींवर मी लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उदाहरणार्थ, मी आक्रमक फलंदाजी करतो, मला ते बदलायला आवडणार नाही.'

शॉ याने असेही म्हटले की त्याच्यासाठी तो खेळत असलेला प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. तो म्हणाला, 'मला वाटते सध्या ज्या सामन्यात खेळण्याची संधी मिळत आहे, ते कशाहीपेक्षा महत्त्वाचे आहे. मग जरी मी दुलीप ट्रॉफीतील सामना खेत असो किंवा मुंबई संघासाठी सामना असो, मला वाटते की महत्त्वाचे हेच आहे की मी माझे सर्वोत्तम द्यावे.'

दरम्यान, दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पृथ्वी शॉ याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 25 आणि 26 धावांची खेळी केली. या सामन्यात दुसऱ्या डावात पश्चिम विभागाकडून खेळताना चेतेश्वर पुजाराने 133 धावांची शतकी खेळी केली होती. या सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात आघाडी घेतल्याने अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केले.

या सामन्यातील त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना शॉ म्हणाला, 'तुम्ही नेहमीच परिपूर्ण असू शकत नाही. पण जेव्हा धावा होत नाही, तेव्हा मी आणखी मेहनत घेण्याचा प्रयत्न करतो. टी२० क्रिकेट थोडे आक्रमक आहे, पण मानसिकता सारखीच असते. माझ्यासाठी प्रथम श्रेणी खेळणे टी२० सारखेच नाही.'

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असलेला शॉ म्हणाला, 'मी गोलंदाजांविरुद्ध शॉट्स खेळून त्यांची लय बिघडवण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांना त्यांच्याप्रमाणे नाही, तर मला हवा तो चेंडू टाकण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करतो.'

'गेल्यावर्षी मी 370 धावाही केल्यानंतर (आसामविरुद्ध 379 धावा) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्व छान होत होते. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषत: आयपीएलमध्ये मला वाटते सर्व विरुद्ध झाले. तुमच्याकडे फलंदाजीच विचार करण्यासाठी फक्त 20 षटके असतात. मी सौरव गांगुली, रिकी पाँटिंग, प्रविण आमरे यांच्याशीही चर्चा केली. पण प्रथम श्रेणी क्रिकेट असे आहे की ज्यात तुमची कसोटी लागते, त्यातून तुम्ही मोठ्या स्थरासाठी सक्षम आहात का, हे समजते.'

शॉसाठी रणजी ट्रॉफीचा मागील हंगाम चांगला ठरला होता. त्याने मुंबईकडून 59.50 च्या सरासरीने 6 सामन्यांमध्ये 595 धावा केल्या होत्या.

काउंटी क्रिकेट खेळणार शॉ

दुलीप ट्रॉफीनंतर शॉ काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्याने नॉर्थहॅम्प्टनशायर संघाशी करार केला होता. तो नॉर्थहॅम्प्टनशायरकडून इंग्लंडमधील देशांतर्गत लिस्ट ए क्रिकेट स्पर्धा रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेतही खेळताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT