Prithvi Shaw - Sapna Gill Controversy: पृथ्वी शॉ अन् सपनामध्ये हॉटेलमध्ये नक्की काय झालेलं? CCTV फुटेज व्हायरल

पृथ्वी शॉ आणि सपना गिल व तिच्या मित्रांमध्ये झालेल्या वादाचे प्रकरण सध्या कोर्टात असून याच घटनेतील एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
Prithvi Shaw - Sapna Gill Controversy
Prithvi Shaw - Sapna Gill ControversyInstagram
Published on
Updated on

Prithvi Shaw - Sapna Gill Controversy: भारतीय क्रिकेट संघाचा 23 वर्षीय सलामीवीर पृथ्वी शॉ सधा मैदानाबाहेरील वादांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिल आणि तिच्या मित्रांबरोबर मोठा वाद झाला होता. हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

या प्रकरण सध्या कोर्टात असून याला नवनवीन वळण मिळताना दिसत आहे. याच प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले आहे. याचवर्षी १५ फेब्रुवारीला शॉ आणि त्याच्या मित्रांचा सपना गिल आणि तिच्या मित्रांबरोबर मुंबईतील नाईटक्लबमध्ये वाद झाला होता. या घटनेवरून आरोपप्रत्यारोप झाले आहेत.

Prithvi Shaw - Sapna Gill Controversy
Prithvi Shaw - Sapna Gill Controversy: पृथ्वी शॉला मोठा दिलासा! सपनाने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांबाबत पोलीस म्हणाले...

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पृथ्वी शॉ याचे सपनाचा मित्र शोबित ठाकूरबरोबर भांडण झाल्याचे दिसत आहे. पृथ्वी शॉ त्याच्या मित्रांबरोबर डान्स करत असताना एक व्यक्ती त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

शॉ त्या व्यक्तीला दूर करतानाही दिसत आहे. याचवेळी भांडणाला सुरुवात झाली. त्यावेळी सपना तिच्या टेबलवर बसलेली दिसत आहे. पण वाद वाढत चालल्याचे पाहून ती मध्ये पडल्याचे दिसते.

पोलिसांकडून पृथ्वी शॉला मिळालेला दिलासा

पृथ्वी शॉ आणि सपना गिल व तिच्या मित्रांमधील भांडण नंतर नाईटक्लब बाहेरही झाल्याचे समोर आले होते. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच शॉ याची कारही फुटलेली दिसत होती.

हे वाद समोर आल्यानंतर शॉ याने आधी सपना आणि तिच्या मित्रांविरुद्ध त्याच्यावर हल्ला करण्याची तक्रार केली होती. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्रांना अटक करण्यात आली होती. पण त्यांना जामीन मिळाल्यानंतर सपना हिने अंधेरी कोर्टात शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादवविरुद्ध विनयभंगाची आणि बेसबॉल बॅटने हल्ला करण्याचा आरोप केला होता.

Prithvi Shaw - Sapna Gill Controversy
Prithvi Shaw- Nidhi Video : पीचवर फॉर्म नसला म्हणुन काय झालं, पृथ्वी भाऊ प्रेमाच्या ट्रॅकवर सुसाट...गर्लफ्रेंड बघितली का?

दरम्यान पोलांसांना तिने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांना सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. तसेच रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी सांगितले होते की त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नसून सपना गिलने केलेले विनयभंगाचे आरोप खोटे आहेत.

सपनाच्या वकिलांकडून करण्यात आलेली व्हिडिओची विनंती

मीडियातील रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर सपनाचे वकील अली काशिफ खान यांनी कोर्टाकडे सपना आणि तिच्या मित्रांनी त्यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सादर करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना नाईटक्लब बाहेरील सीसीटीव्ही फुटेजचीही मागणी केली होती. यानंतर आता नाईटक्लबमधील घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com