Qatar vs Senegal Dainik Gomantak
क्रीडा

Qatar vs Senegal: सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान कतार स्पर्धेतून बाहेर पडणार...

सेनेगल संघाने 3-1 गोलफरकाने मिळवला विजय

Akshay Nirmale

Qatar vs Senegal: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील सहाव्या दिवशी शुक्रवारी दुसरा सामना ग्रुप ई मधील यजमान कतार आणि सेनेगल या संघांमध्ये झाला. सामन्यात सेनेगलने कतारवर 3-1 अशा गोलफरकाने मात केली. ग्रुप पातळीवर सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान कतारचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ए गटातील पुढच्या सामन्यात जर इक्वाडोरकडून नेदरलँडचा संघ पराभूत झाला तरच या स्पर्धेतील कतारचे आव्हान टिकणार आहे, अन्यथा, दोन सामन्यातच कतारचा डाव आटोपणार आहे.

(FIFA World Cup 2022)

दोहातील अल थुमामा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सेनेगलच्या बुलाए दिया याने कतारच्या बचावपटुंच्या चुकीचा लाभ घेत 41 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत सेनेगलला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच सेनेगलच्या फमारा दिएधोऊ याने 48 व्या मिनिटाला गोल करत सेनेगलची आघाडी वाढवली. फर्स्टहाफमध्ये सेनेगलची 2-0 अशी आघाडी कायम राहिली.

उत्तरार्धात 78 व्या मिनिटाला कतारच्या मोहम्मद मुनतारी याने गोल नोंदवत सेनेगलची आघाडी 2-1 वर आणली. पण त्यानंतर सहाच मिनिटांनंतर सेनेगलच्या बाम्बा दिएंग याने 84 व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवत सेनेलगची आघाडी 3-1 अशी भक्कम केली. पुर्णवेळेत ही आघाडी कायम राहिली. भरपाई वेळेतही कतारला सेनेगलशी चांगली टक्कर देता आली नाही.

धसमुसळ्या खेळाबद्दल दोन्ही संघांच्या प्रत्येकी तीन खेळाडुंना पंचांनी यलो कार्ड दाखवले. कतारच्या तुलनेत सेनेगलने चेंडुवर नियंत्रण राखले. सेनेगलला सात तर कतारला सहा कॉर्नर मिळाले. दरम्यान, फिफा रँकिंगमध्ये कतार 50 व्या स्थानावर आहे तर सेनेगल 18 व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT