Iran beats Wales: इराणचा वेल्सवर थरारक विजय; भरपाई वेळेत शेवटच्या 5 मिनिटांमध्ये 2 गोल

वेल्सचा राऊंड ऑफ 16 चा मार्ग खडतर
Iran beats Wales
Iran beats WalesDainik Gomantak
Published on
Updated on

Iran beats Wales: फिफा वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी ग्रुप बी मध्ये झालेला वेल्स विरूद्ध इराण हा सामना पुर्णवेळेत गोल शुन्य बरोबरीत राहिला होता पण भरपाई वेळेत इराणने दोन गोल नोंदवून वेल्सला पराभूत केले. भरपाई वेळेत अखेरच्या 5 मिनिटांमध्ये इराणच्या खेळाडुंनी 2 गोल नोंदवले.

(FIFA World Cup 2022)

Iran beats Wales
IND vs NZ: लॅथमने विक्रमी शतक तर केलेच, पण विलियम्सनबरोबरची भागीदारीही ठरली 'नंबर वन'

सेकंड हाफमध्ये 86 व्या मिनिटाला वेल्सच्या वेन हेनेसी याला धसमुसळ्या खेळाबद्दल पंचांनी रेड कार्ड दाखवले. त्यामुळे त्याला तत्क्षणी मैदान सोडावे लागले. पुर्णवेळेचा खेळ संपल्यानंतर 11 मिनिटे भरपाईवेळेसाठी दिली गेली. त्यात 8 व्या मिनिटाला रौझबेह चेशमी याने इराणकडून गोल नोंदवला. तर नंतर दोनच मिनिटांत इराणच्या रामिन रेझाईयान याने गोलची नोंद करून इराणची आघाडी 2-0 अशी वाढवली. अखेरच्या मिनिटांमध्ये हे गोल झाल्याने वेल्स संघाला गोल फेडण्याची संधीच मिळाली नाही.

Iran beats Wales
Umran Malik Bawling: उमरान मलिकचा पदार्पणातच तिखट मारा, 150 km/h वेगाने फेकले चेंडू, पाहा Video

फर्स्ट हाफमध्ये सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला. फर्स्टहाफमध्ये वेल्सला गोलच्या चार संधी मिळाल्या, पैकी दोन शॉट टारगेटवर होते. इराणची फर्स्टहाफमधील स्थितीही अशीच होती. त्यांचेही दोनच शॉट टारगेटवर होते. फर्स्टहाफमध्ये चेंडूवर नियंत्रण राखण्यात वेल्स आघाडीवर होता. त्यांनी चेंडूवर 66 टक्के नियंत्रण राखले.

इराणच्या गोलिजादेह याने 16 व्या मिनिटाला चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. पण व्हिडिओ असिस्टेंड रेफरल (VAR) ने हा गोल फेटाळला. कारण गोलिजादेह हा वेल्सच्या बचावपटुंच्याही पुढे होता.

फिफा रँकिंगमध्ये वेल्स 19 व्या स्थानावर आहे तर इराण 20 व्या स्थानी आहे. इराणचा संघ आशियात सर्वोत्कृष्ट असला तरी युरोपातील संघांविरोधात इराणचे रेकॉर्ड चांगले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com