शिवप्रेमींकडून सडा येथे पुतळ्याचे अनावरण, वाद वाढण्याची शक्यता; प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने टांगती तलवार

Shivaji Maharaj statue Sada junction: हेडलॅंड, सडा येथील जंक्शन परिसरात अनधिकृत पुतळ्याप्रकरणी निर्माण झालेला कायदेशीर पेच बाजूला सारून येथील शिवप्रेमींनी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.
Shivaji Maharaj statue Sada junction
Shivaji Maharaj statue Sada junctionDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: हेडलॅंड, सडा येथील जंक्शन परिसरात अनधिकृत पुतळ्याप्रकरणी निर्माण झालेला कायदेशीर पेच बाजूला सारून येथील शिवप्रेमींनी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.

सडा येथील चौकात ज्या जागेवर हा पुतळा उभारला आहे, ती जागा मुरगाव बंदर प्राधिकरणाची (एमपीए) आहे. त्यामुळे एमपीएने या पुतळ्याला हरकत घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली आहे.

या याचिकेवर २३ रोजी सुनावणी होणार आहे. मात्र शिवप्रेमींनी शिवजयंतीचे औचित्य साधून मोकळ्या जागेत पुतळा उभारला. परंतु न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे या पुतळ्याचा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Shivaji Maharaj statue Sada junction
Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

शिवप्रेमींकडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून सडा नाक्यावरील मार्केट प्रकल्पाच्या मागच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेवर पुतळा उभारण्याचे प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी हा परिसर साफ करून तिथे पुतळा उभारण्याची तयारी चालवली होती.

तात्पुरता लोखंडी चौथरा उभारून त्या ठिकाणी पुतळा आणून ठेवला होता. याला एमपीएने आक्षेप घेत बुधवारी उशिरा न्यायालयात धाव घेतली. याची माहिती गुरुवारी हेडलॅंड परिसरात पसरताच दिवसभर या भागात वातावरण काहीसे गंभीर होते.

एमपीएचा निषेध करून पुतळा उभारण्याचा निर्धार

शिवप्रेमींसह भाजपचे जयंत जाधव, डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद प्रभुगावकर, शांताराम पराडकर तसेच प्रेमानंद केरकर आदी नागरिकांनी एकत्र येत एमपीएच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला व त्या जागेवर पुतळा उभारण्याचा निर्धार केला. त्यानुसार सायंकाळी ७.३० वाजता पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Shivaji Maharaj statue Sada junction
Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

गेली दोन वर्षे मी एमपीएकडे विनावापर पडून असलेल्या या जागेची मागणी करत होतो. याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही एमपीएला निवेदन पाठवून या जागेची मागणी केली होती. तसेच केंद्रीय जहाजोद्योग मंत्र्यांना निवेदन पाठवले, परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने शिवप्रेमींचा संयम संपला व शेवटी पुतळा उभारावा लागला. जर राष्ट्रीय नायकाचा पुतळा उभारण्यास आडकाठी आणली जाते, याहून मोठी शोकांतिका नाही.

- आमदार संकल्प आमोणकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com