India Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy जिंकताच भारतीय संघाला इतक्या लाखांचे बक्षीस, हॉकी इंडियाची मोठी घोषणा

Hockey India: चौथ्यांदा आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी हॉकी इंडियाने रोख रकमेच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Hockey India Announces cash prize for Players and Support Staff of Asian Champions Trophy 2023 Winning team:

भारतीय हॉकी संघाने शनिवारी (12 ऑगस्ट) आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 विजेतेपदावर नाव कोरले. अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियावर ४-३ अशा गोलफरकाने विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

त्यामुळे हॉकी इंडियाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी रोख रकमेच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.

भारताने चौथ्यांदा आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

हॉकी इंडियाकडून लाखोंचे बक्षीस

हॉकी इंडियाने शनिवारी भारताने सुवर्णपदक जिंकल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर पोस्ट करत बक्षीसाबद्दल माहिती दिली.

पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीसाठी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 1.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

अपराजित भारत

चेन्नईत झालेल्या आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. भारताने साखळी फेरीत 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तसेच एका सामन्यात बरोबरी साधली होती.

त्यामुळे गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत भारताने जपानला 5-0 अशा फरकाने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केलेला. अंतिम सामन्यात भारताने मलेशियालाही मात देत सुवर्णपदक जिंकले.

अंतिम सामन्यात भारताचे शानदार पुनरागमन

अंतिम सामन्यात भारताकडून जुगराज सिंगने (9') पहिला गोल नोंदवला होता. त्यानंतर मलेशियाकडून अझराई अबू कमलने (14') गोल केला आणि बरोबरी साधली. तसेच राझी रहिम (18') आणि मुहम्मद अमिनुदीन (28') यांनी मलेशियाची आघाडी भक्कम केली होती.

त्यामुळे हाफ टाईमपर्यंत मलेशिया या सामन्यात 3-1 अशी आघाडीवर होते. मात्र तिसऱ्या क्वार्टर्सच्या अखेरच्या मिनिटात भारताकडून हरमप्रीत सिंग (45') आणि गुरजंत सिंगने (45') गोल करत भारताला बरोबरी साधून दिली होती.

त्यानंतर अखेरचे 4 मिनिटे बाकी असताना भारताकडून आणखी एक गोल आकाशदीप सिंगने (56') नोंदवत भारताला मोक्याच्या क्षणी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे अखेरीस भारताने हा सामना जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT