Asian Champions Trophy Hockey: चक दे इंडिया! भारतीय संघाला विजेतेपद, फायनलमध्ये मलेशियाचा उडवला धुव्वा

Malaysia vs India Final: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेचे भारताने चौथ्यांदा विजेतेपद जिंकले आहे.
India Hockey Team
India Hockey TeamDainik Gomantak
Published on
Updated on

India Hockey team win Asian Champions Trophy 2023 after beating Malaysia in Final:

आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नईत शनिवारी (12 ऑगस्ट) भारत विरुद्ध मलेशिया या हॉकी संघात झाला. अखेरपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय हॉकी संघाने उत्तरार्धात शानदार पुनरागमन करत विजय संपादन केला. याबरोबरच या स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद जिंकले.

भारताने अंतिम सामन्यात मलेशियाविरुद्ध 4-3 गोलफरकाने विजय मिळवला. याआधी भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

India Hockey Team
Asian Champions Trophy Hockey: जेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये घुमतो 'वंदे मातरम'चा आवाज; पाहा अंगावर शहारे आणणारा Video

अंतिम सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघात चूरस पाहायला मिळाली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये मलेशियाने आक्रमक सुरुवात केली होती. पण 8 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जुगराज सिंगने अचूक निशाणा साधत भारतासाठी पहिला गोल नोंदवला.

पण त्यानंतर पहिले क्वार्टर संपण्यास केवळ 1 मिनिट राहिला असताना मलेशियाकडून अझराई अबू कमलने गोल केला आणि बरोबरी साधली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मलेशियाने अधिक आक्रमक खेळ केला.

सामन्याच्या 18 व्या मिनिटाला 35 वर्षीय राझी रहिमने मलेशियासाठी पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली.

ही आघाडी मुहम्मद अमिनुदीनने वाढवली. त्याने 28 व्या मिनिटाला पेनल्टीवरच गोल करत मलेशियाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे सामन्याचा पहिला हाफ संपला तेव्हा भारतीय संघ पिछाडीवर होता.

India Hockey Team
Asian Champions Trophy Hockey: भारताचा फायनलमध्ये प्रवेश! उपांत्य फेरीत जपानवर मिळवला दणदणीत विजय

तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाने चांगला बचाव करताना गोल होऊ दिले नव्हते.मात्र या क्वार्टरमधील अखेरचा मिनिट नाट्यमय ठरला. 45 व्या मिनिटाला आधी कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला, तर नंतर लगेचच गुरजंत सिंगने मैदानी गोल करत भारताला 3-3 अशी बरोबरी साधून दिली.

त्यामुळे चौथे क्वार्टर निर्णयाक ठरणार होते. या क्वार्टरमध्ये पहिल्या 10 मिनिटात दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण गोल करता आला नाही.मात्र सामन्याच्या 56 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी अखेरच्या क्षणी वाढवली.

त्यानंतर अखेरच्या चार मिनिटात भारताने मलेशियाला गोलची संधी दिली नाही आणि सामना जिंकत विजेतेपदही नावावर केले.

जपान तिसऱ्या क्रमांकावर

अंतिम सामन्यापूर्वी  जपान आणि कोरिया या हॉकी संघात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सामना रंगला. या सामन्यात जपानने 5-3 अशा फरकाने कोरियाला नमवत तिसरा क्रमांक पटकावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com