T20 World Cup India team Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: टीम इंडियाची चिंता वाढली! विश्वचषकापूर्वी वाईट बातमी; 'हा' स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Harshit Rana Injury: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात झालेल्या सराव सामन्यात युवा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला.

Sameer Panditrao

T20 World Cup 2026 : आगामी शनिवारी (७ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तोंडावर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात झालेल्या सराव सामन्यात युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. गुडघ्याला त्रास जाणवत असल्याने राणाला लंगडत मैदान सोडावे लागले.

२४ वर्षीय दिल्लीच्या राणाने सामन्यात अवघा एक षटक टाकले. त्या षटकात त्याने १६ धावा दिल्या. मात्र, गोलंदाजी करताना दोनदा धाव घेण्याच्या टप्प्यावर तो थांबलेला दिसला. काही क्षणांतच गुडघा पकडत त्याने मैदान सोडले आणि उर्वरित सामन्यात तो सहभागी होऊ शकला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अद्याप अधिकृत वैद्यकीय माहिती जाहीर झालेली नसल्याने राणाच्या दुखापतीची तीव्रता नेमकी किती, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

याआधी फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यानंतर सुंदर अद्याप विश्वचषक शिबिरात सहभागी झालेला नाही. त्यामुळे स्पर्धा जवळ येत असताना संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, तिलक वर्माने दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करत दिलासा दिला. त्याने १९ चेंडूंत ४५ धावांची खेळी साकारली; यात तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. गोलंदाजीतही त्याने किफायतशीर षटक टाकले.

दुखापतीच्या बातम्यांनंतरही भारताने सराव सामन्यात ३० धावांनी विजय मिळवला. ईशान किशनने २० चेंडूंत ५३ धावा झळकावत संघाला २४१/५ पर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर गोलंदाजांनी योगदान देत दक्षिण आफ्रिकेला २१०/७ पर्यंत रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT