AB de Villiers | Hardik Pandya | Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya Six: 'थँक्यू, कोणीतरी बोललेच...', हार्दिक-तिलकच्या प्रकरणात डीविलियर्सचीही उडी

AB de Villiers: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात हार्दिक पंड्याच्या विजयी षटकारामुळे तिलक वर्माच्या हुकलेल्या अर्धशतकाच्या प्रकरणाबद्दल हर्षा भोगले आणि एबी डीविलियर्स यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Harsha Bhogle and AB de Villiers reacted on Hardik Pandya Winning Six denies Tilak Varma chance to hit fifty Controversy:

भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध गयाना येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने विजयी षटकर मारला. पण तरीही तो तिलक वर्माचे सलग दुसरे अर्धशतक हुकल्याने बराच ट्रोल झाला होता.

पण असे असले तरी त्याला आता प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीविलियर्स यांचा पाठिंबा मिळाला आहे.

झाले असे की तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोव्हमन पॉवेलने गोलंदाजी केलेल्या १७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिलक वर्माने १ धाव काढली. त्यामुळे तो ४९ धावांवर पोहचला होता.

तसेच त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ २ धावांची गरज होती आणि अद्याप १४ चेंडू बाकी होते. पाचव्या चेंडूवर हार्दिक स्ट्राईकवर आला.

त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की हार्दिक एक धाव घेऊन तिलकला स्ट्राईक देईल किंवा या षटकातील उर्वरित दोन्ही चेंडू खेळून काढेल. जेणेकरून तिलक स्ट्राईकला येईल आणि भारताला विजय मिळवून देण्याबरोबरच त्याचे अर्धशतकही पूर्ण होईल.

मात्र, हार्दिकने 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचला आणि भारताने हा सामना 13 चेंडू राखूनच जिंकला. त्यामुळे तिलक ४९ धावांवर नाबाद राहिला. यामुळे हार्दिकवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेकांनी त्याला स्वार्थी म्हटले.

पण, या घटनेबद्दल हर्षा भोगले यांनी हार्दिकला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे, ज्याला डीविलियर्सनेही सहमती दर्शवली आहे.

हर्षा भोगले यांनी ट्वीट केले की 'तिलक वर्माचे अर्धशतक हुकल्याबद्दल झालेल्या चर्चेने मी हैराण झालो आहे. हा काही मैलाचा दगड नाही, खरंतर टी20 क्रिकेटमध्ये शतकाशिवाय (जे दुर्मिळ आहे) कोणताही मैलाचा दगड नाही.'

'आपण सांघिक खेळात वैयक्तिक यशाला खूप जास्त महत्त्व देत आहोत. टी20 क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या वैयक्तिक आकडेवारीमध्ये अर्धशतकाची नोंद व्हावी असे मला वाटच नाही. जर तुम्ही जलद गतीने धावा करत असाल, तर तुमची सरासरी आणि धावगतीच महत्त्वाची आहे.'

यानंतर एबी डीविलियर्सने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले की 'धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शेवटी कोणीतरी हे बोलले.'

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. सध्या 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत वेस्ट इंडिज पहिल्या तीन सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT