Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

IND W vs BAN W: 'पुढच्यावेळी बांगलादेशला येताना अशा अंपायरिंगची तयारी करून येऊ', असं का म्हणाली हरमनप्रीत?

Harmanpreet Kaur: बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौरने पंचांवर राग व्यक्त केला होता.

Pranali Kodre

Harmanpreet Kaur slams umpiring: शनिवारी (22 जुलै) भारतीय महिला आणि बांगलादेश महिला संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. रोमांचक झालेला हा सामना बरोबरीत सुटला. पण हा सामना काही वादांमुळेच चर्चेत राहिला.

या सामन्यात पंचांच्या निर्णयावरून भारतीय संघ प्रचंड निराश दिसून आला. त्याबद्दल सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिची निराशा स्पष्टपणे व्यक्त केली.

सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, 'या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले आहे. क्रिकेटव्यतिरिक्त ज्याप्रकारे अंपायरिंग इथे झाली, आम्ही त्याने चकीत झालो. पुढच्यावेळी आम्ही जेव्हा बांगलादेशला येऊ, तेव्हा आम्ही नक्कीच अशाप्रकारच्या अंपायरिंगचा सामना करण्याच्या तयारीने येऊ. आम्ही स्वत:ला तयार ठेवू.'

नक्की काय झाले होते?

या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशने दिलेल्या 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला असताना 34 व्या षटकात हरमनप्रीत कौरला 14 धावांवर असताना नाहिदा अख्तरच्या गोलंदाजीवर बाद देण्यात आले.

झाले असे की ज्यावेळी तिने या षटकातील चौथा चेंडूवर स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चेंडू तिच्या पॅडला लागून स्लीपमध्ये गेला, त्यावेळी फाहिमा खातूननेही तिचा झेल घेतला होता. पण चेंडू तिच्या पॅडला लागण्यापूर्वी ग्लव्ह्जला लागला असल्याची शक्यताही होती. दरम्यान रिप्लेमध्येही याबद्दल अंदाज लावता आला नाही.

त्यावेळी तिला पायचीत बाद दिल्याचे समजून तिने राग व्यक्त केला. कारण तिच्यामते चेंडू पॅडला लागण्यापूर्वी ग्लव्ह्जला लागाल होता तिने पंचांशीही चिडून निराशा व्यक्त केली. तसेच नंतर बॅट जोरात स्टंपवर मारली. तसेच परत पॅव्हेलियनमध्ये परतताना प्रेक्षकांकडे पाहून तिचा अंगठाही दाखवला होता. मात्र, पंचांनी फाहिमा खातूनने झेल घेतल्यानंतर निर्णय दिला होता.

याच सामन्यात हरमनप्रीतच्या विकेटपूर्वी यास्तिका भाटियानेही 5 व्या षटकात तिच्या पायचीतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

सामन्यात बरोबरी

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास बांगलादेश महिलांनी प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध वनडेतील सर्वोच्च 225 धावसंख्या उभारली होती. बांगलादेशकडून फरंगा हकने 160 चेंडूत 107 धावांची शतकी खेळी केली.

त्यामुळे ती वनडेत शतक करणारी पहिली बांगलादेशी महिला क्रिकेटपटूही ठरली. तिला शमिमा सुलतानाने 52 धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळे बांगलादेशने 50 षटकात 4 बाद 225 धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतालाही 49.3 सर्वबाद 225 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. भारताकडून हर्लिन देवोलने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली.

तसेच स्मृती मनधानाने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच जेमिमा रोड्रिग्सने ३३ धावांची खेळी केली. या दोघींव्यतिरिक्त कोणालाही 15 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान या सामन्यात बरोबरी झाल्याने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता, तर दुसरा सामना भारताने जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

SCROLL FOR NEXT